आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियंकाचे वादग्रस्त घर पाहाण्यासाठी सोनिया गांधी हिमाचलमध्ये, बघा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनिया आणि प्रियंका तीन दिवसांसाठी शिमल्यात आल्या आहेत. - Divya Marathi
सोनिया आणि प्रियंका तीन दिवसांसाठी शिमल्यात आल्या आहेत.
शिमला - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका वढेरा यांचे शिमल्यातील छराबडा परिसरात समर हाऊस बांधले जात आहे. ते पाहाण्यासाठी दोघी माय-लेकी सोमवारी येथे आल्या होत्या. कन्स्ट्रक्शन साइटवर काही वेळ फिरून त्यांनी कामाची पाहाणी केली. तासा-दीड तासानंतर सोनिया गांधी हॉटेलवर परत गेल्या, प्रियंका मात्र बराचवेळ तिथेच थांबून होत्या. सोनिया आणि प्रियंका सध्या सुटीत शिमल्याला आल्या आहेत.

काय आहे समर हाऊसचा वाद
- शिमल्या जवळील छराबडा येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका वढेरा यांचा नवा आशियाना तयार होत आहे.
- सोनिया आणि प्रियंका दिल्लीहून विशेष विमानाने चंदीगडला आल्या. तेथून कारने त्या शिमल्यात पोहोचल्या.
- सोमवारी दुपारी दोन वाजता त्या येथील वाइल्ड फ्लावर हॉल हॉटेल येथे पोहोचल्या. थोडावेळ विश्रांती करुन त्या बांधकामाची पाहाणी करण्यासाठी रवाना झाल्या.
- यावेळी त्यांच्यासोबत दिल्लीहून आलेले काही आर्किटेक्ट होते. दोन मजली घराची पाहाणी केल्यानंतर सोनिया आणि प्रियंका यांनी घरात काही बदल सुचवले. त्याची नोंद आर्किटेक्टने करुन घेतली.
- प्रियंका यांचा आग्रह आधुनिकतेकडे कमी आणि स्थानिक शैलीकडे अधिक आहे.

असे आहे प्रकरण
देवाशीष भट्टाचार्य यांनी 2014 मध्ये प्रियंका गांधी यांच्या जमिनीची नोंदणी, फाइल नोटिंग, बांधकामाचे स्टेट्स आदी विषयांवर माहिती मागितली होती. सिमल्याच्या एडीएम यांनी या अर्जातील एका भागाला रद्द केले होते. सुरक्षेच्या कारणामुळे याची माहिती देता येणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले होते. तेव्हा याची खुप उलट सुलट चर्चा झाली होती.

प्रियंकांना हवे साध्या आणि पारंपरिक शैलीतील घर
प्रियंका यांचा हा आशियाना दोन मजली असणार आहे. यातील अंतर्गत सजावट देवदारच्या लाकडांनी केली जाणार आहे. येथील स्थानिक शैलीनुसार या घराचे छत पारंपरिक पद्धतीचे अर्थात स्लेटपोश असणार आहे. त्यांना याच वर्षी हे घर पूर्ण झालेले पाहाण्याची इच्छा आहे. घराच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. खासकरुन घराच्या छताची विशेष दक्षता घेतली जात आहे. पहाडी शैलीतील या घराचे कंत्राट स्थानिक कंस्ट्रक्शन कंपनी तेंजिन असोसिएट्सला देण्यात आले आहे. 2008 मध्ये घराच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. सुरुवातीला देशातील एका प्रसिद्ध कंन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यांचे काम प्रियंका यांच्या पसंतीस उतरले नाही म्हणून जवळपास 40 टक्के झालेले बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आणि स्थानिक कंपनीला हे काम देण्यात आले.
कुठे आहे छराबडा
- प्रियंका यांचा हा आशियाना छराबडा गावात बांधला जात आहे. शिमल्यापासून 13 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या घराजवळच राष्ट्रपती निवासस्थान आहे.
- प्रियंका यांनी 2007 मध्ये राज्य सरकारकडून घर बांधण्यासाठी जमीन खरेदी केली होती.
- हे घर जमीनीपासून 8 हजार फूट उंचीवर आहे. याच्या चहुबाजूला पाइनची सुंदर झाडी आहे.
याआधीही आल्या होत्या सोनिया
- प्रियंका यांच्या घराचे बांधकाम 2011 मध्ये सुरु झाले होते. मात्र ते पाडण्यात आले आणि पुन्हा नव्याने बांधकामाला सुरुवात 2012 मध्ये झाली होती.
- 2015 च्या डिसेंबरमध्ये प्रियंका आणि सोनिया कन्स्ट्रक्शन साइटला भेट देण्यासाठी आल्या होत्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आहे प्रियंका गांधींचे समर हाऊस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)