आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonia, Rahul Gandhi Should Take Break, Says Congressman From Punjab

आता काँग्रेस नेत्यांचा प्रेमळ सल्ला, सोनिया-राहुल यांनी दोन वर्ष सुटीवर जावे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : काँग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्‍यक्ष राहुल गांधी.

नवी दिल्‍ली - लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या पराभवानंतर एकापाठोपाठ एक काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल आणि सोनिया गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यात आता आणखी एका नेत्याने सरळ यांना एक मोठी सुटी घेण्याचा सल्ला देऊन टाकला आहे. पंजाब कँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि काँग्रेस वर्किंग कमिटीचे माजी सदस्य जगमित सिंग बराड यांनी हे मत व्यक्त केले. पराभवानंतर सोनिया आणि राहुल यांनी दोन वर्षांचा ब्रेक घेतल्यास त्यात काही चुकीचे नसल्याचे बराड म्हणाले.

नवीन हाती द्यावी धुरा
पंजाबचे माजी खासदार राहिलेल्या बराड यांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या पराभवानंतर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (एआयसीसी) च्या सर्व सरचिटणीसांनी पदाचा राजीनामा देऊन पक्षाचे नेतृत्व नव्या कार्यकर्त्यांकडे सोपवायला हवे होते. सोनिया आणि राहुल गांधींना ब्रेक घेण्याचा सल्ला देत त्यांनी म्हटले आहे की, गांधी कुटुंबीय आरामानंतर पुन्हा जोरदार पुनरागमन करतील याचा मला विश्वास आहे. पक्षासाठी अनेक वर्ष झटलेला एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आपण हे मत मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सल्लागारांवर टीका
सोनिया आणि राहुलशिवाय बराड यांनी नेत्यांना सल्ला देणा-या सल्लागारांवरही निशाणा साधला. त्यांनी सर्वांनी पद सोडायला हवे असे त्यांनी म्हटले. हे सल्लागार कार्यकर्त्यांना नेतृत्वाबरोबर चर्चाच करू देत नाही, असे बराड म्हणाले.
'पराभव' ही सामुहिक जबाबदारी
निवडणुकीतील पराभव ही सामुहिक जबाबदारी असून यासाठी केवळ सोनिया आणि राहुल गांधी या दोघांनाच जबाबदार ठरवता येणार नसल्याचे बराड म्हणाले. प्रत्येकाला या पराभवाची जबाबदारी घ्यावी लागेल. जर एखाद्याने अनेक वर्षे अध्यक्ष बनून पक्षाची सेवा केली असेल, तर त्याने दोन वर्षे सुटी घेतली तर त्यात वाईट काय? असे माझे मत आहे. सोनियांनी अध्यक्ष म्हणून पक्षासाठी सर्वोत्तम काम केले असल्याचे ते म्हणाले.