आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Soon You Can Buy Onions Online, Courtesy Reliance

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदे-बटाटेही आता मिळणार ऑनलाईन, मुंबईत वर्षाअखेरीस सुरू होणार सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - रिलायन्स इंडस्‍ट्रीज ताजी फळे आणि भाज्यांची ऑनलाईन विक्री करण्याची योजना आखत आहे. रिलायन्स वर्षाच्या अखेरिपर्यंत ही सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम मुंबईमध्ये फळे आणि भाज्यांची डिलेव्हरी सुरू करण्याची कंपनीची योजना आहे. रिलायन्स या क्षेत्रात एका नव्या ब्रँडनेमसह उतरणार आहे.
द इकॉनॉमिक टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, ई कॉमर्स सेक्टरमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असणा-या रिलायन्स इंडस्ट्रीजची त्यांच्या रिटेल व्यवसायाचा विस्तार करण्याचीही योजना आहे. ऑनलाईन शॉपींगसाठी ग्राहकांना जास्तीत जास्त रेंज उपलब्ध करून देणे हा कंपनीचा उद्देश आहे.
जुनाचा प्रोजेक्ट
किराणा सामानाची ऑनलाईन विक्रीचा हा पहिला प्रयत्न नाही. याआधी, localbanya.com आणि bigbasket.com अशा काही कंपन्यांनी काही शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, रिलायन्स सारखे मोठे ब्रँड या क्षेत्रात उतरल्यामुळे देशाच्या इतर भागांमध्येही लवकरच ही सेवा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पायलट प्रोजेक्‍टला यश
रिलायंन्सने या व्यवसायात उतरण्याआधी नवी मुंबईयेथील कंपनीच्या कॉर्पोरेट पार्क ऑफिसमध्ये यासंबंधी पायलट प्रोजेक्ट राबवला होता. त्याला मोठे यश मिळाले. गेल्या एखा वर्षात सुमारे 10 हजार रिलायन्स कर्मचारी हे होम केअर, पर्सनल गुड्स, औषधे यांच्याबरोबरच खाण्याच्या वस्तू कंपनीच्या फ्रेश प्रोजेक्‍ट डायरेक्‍ट वेबसाइटद्वारे खरेदी करत आहेत.
इलेक्‍ट्रॉनिक गुड्सदेखिल विकणार
कंपनी वर्षाच्या अखेरीपर्यंत मोबाइल फोनसह इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची ऑनलाईन विक्रीही सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी सध्या योजना आखली जात आहे.

मुकेश अंबानींचे नवे धोरण
ऑनलाइन रिटेल बाजारपेठेवर कब्‍जा मिळवणे हा मुकेश अंबानींच्या व्‍यापक धोरणाचा एक भाग आहे. हे व्यापक धोरण म्हणजेच 'रिलायन्स जिओ' प्रोजेक्‍ट. या अंतर्गत ते टेलिकॉम, इंटरनेट आणि डिजिटल कॉमर्सला एका प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या विचारात आहेत. मुकेश अंबानींनी त्यांच्या कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये या योजनेचा खुलासा केला होता. ई-कॉमर्स श्रेत्रात सध्या परकीय गुंतवणुकीवर बंदी आहे. त्यामुळे परकीय कंपन्या हा नियम बदलावा म्हणून लॉबींगही करत आहेत. पण त्याआधीच या क्षेत्रावर ताबा मिळवण्याच्या रिलायन्स या भारतीय कंपनीचा विचार आहे.
फोटो : प्रतिकात्‍मक