आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसला बनायचे होते पॉलिटिशियन, जाणून घ्या कशी आली चित्रपटांमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - साऊथची अॅक्ट्रेस सोनिया मान एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने चंदीगडला पोहोचली होती. यावेळी दैनिक भास्करशी केलेल्या खास बातचीतमध्ये तिेने चित्रपट कारकिर्दीबद्दल दिलखुलास गप्पा केल्या. सोनिया म्हणाली, जर मी चित्रपटात नसते तर नक्कीच राजकारणात काहीना काही केले असते.
साऊथच्या चित्रपटांतून करिअरची सुरुवात
- सोनिया अमृतसरची रहिवासी आहे. तिेन करिअरची सुरुवात 2007 मध्ये साऊथच्या चित्रपटांतून केली होती.
- तिने 6-7 चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर सोनियाची लिम्का फ्रेश फेस ऑफ पंजाबसाठी निवड झाली. त्यानंतर तिने पुन्हा चित्रपटांकडे मोर्चा वळविला. हरभजन मानची पंजाबी फिल्म 'हाणी'मधील तिचा रोल चर्चेत राहिला होता.
- त्यानंतर तिने पंजाबी फिल्म ‘बड़े चंगे ने' व "मेरे यार कमीने' या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर आपल्या अभियानात सुधारणा करण्यासाठी तिने मायानगरी मुंबई गाठली. मुंबईतील एका अॅक्टिंग स्कुल मध्ये तिने प्रवेश घेतला.

साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करणे अवघड
- सोनियाचे मत आहे की प्रियंका गांधी आणि बेनझीर भुट्टो यांच्या आयुष्यावर बायोपिक तयार करता येईल.
- या बायोपिकमुळे अनेकांना प्रेरणा मिळू शकेल. एखाद्या महिलेच्या आयुष्यावर बायोपिक तयार होत असेल तर त्याचा एक भाग होण्याची इच्छाही सोनियाने व्यक्त केली. विशेषतः प्रियंका गांधींच्या बायोपिकमध्ये काम करण्याची तिला इच्छा आहे.
- सोनिया सांगिते, की पंजाबी इंडस्ट्रीमधील अनुभवापेक्षा साऊथमध्ये काम करणे अवघड आहे. सर्वात मोठी अडचण भाषा ठरते.
- त्यासोबतच साऊथच्या फिल्मचा पसारा फार मोठा असतो. तिथे कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषेत चित्रपट तयार होतात.
- प्रत्येक चित्रपटांचा वेगळा उद्देश असतो. कन्नड चित्रपट हे विशेषतः फेस्टिव्हल्सच्या उद्देशाने तयार केले जातात.
- तर, पंजाबी चित्रपटांची कन्सेप्ट वेगळी असते. येथे कल्चर आणि कमर्शियल असा उद्देश असतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोनिया मानचा ग्लॅमरस अंदाज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...