आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्‍मीरमध्‍ये दहशतवादी हल्‍ल्‍यात 6 पोलिस जवान शहीद, अतिरेकी मट्टू चकमकीत ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवारी शहीद शहजाद दिलावर सौफी यांना मानवंदना देण्‍यात आली. - Divya Marathi
शुक्रवारी शहीद शहजाद दिलावर सौफी यांना मानवंदना देण्‍यात आली.
श्रीनगर- काश्मीरच्या बिजबहेडातील अरवनी भागात एका चकमकीमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात व मोस्ट वाँटेड अतिरेकी जुनैद मट्टूसह तीन अतिरेकी मारले गेले. दरम्यान, याचा बदला घेण्यासाठी अतिरेक्यांनी काही तासांतच पोलिस पथकावर हल्ला केला. यात सहा जवान शहीद झाले. मट्टू याच्यावर १० लाखांचे बक्षीस होते. दरम्यान, एकीकडे चकमक सुरू असताना लोकांची दगडफेकही सुरू होती. दुसरीकडे, ताबा रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात नायक बख्तावरसिंग शहीद झाले.

दरम्यान, गुरुवारी सायंकाळी लष्कराच्या पथकावर तुफान दगडफेक करणाऱ्या जमावावर जवानांनी केलेल्या गाेळीबारात जखमी झालेल्या युवकाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...