आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP Govt Intends To Withdraw Some Terror related Cases: BJP

... तर मुलायमसिंह यांना घरा बाहेर पडू देणार नाही - अमित शाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झांशी - उत्तरप्रदेशमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध दाखल खटले सत्ताधारी समाजवादी पक्ष मागे घेण्याच्या तयारीत आहे, त्यांची कृती घटनाविरोधी असून भारतीय जनता पक्ष हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री अमित शाह यांनी दिला आहे.

शाह हे गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. शाह तीन दिवसांच्या उत्तरप्रदेश दौ-यावर आहेत. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना ते म्हणाले, राज्यात दाखल असलेले दहशतवाद्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आणि त्यांची सुटका करण्याचे ष़डयंत्र राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाने आखले आहे. त्यांनी असे केले तर, समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांना भाजप घराबाहेर पडू देणार नाही.

उत्तरप्रदेशात 21 जणांविरुद्ध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे खटले दाखल आहेत. ते लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मागे घेण्याचा घाट राज्याचे मुख्यमंत्री आणि मुलायमसिंह यांचे चिरंजीव अखिलेश यांच्या सरकारने घातला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या प्रस्तावाला सध्या स्थगिती दिली आहे. तरीही अखिलेश सरकारचे या प्रस्तावासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत, असे शाह यांनी सांगितले.