आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SP Leader Azam Khan Said Taj Mahal Is Property Of Wakf Board

ताजमहालाचा ताबा वक्फकडे द्या, आजम खान यांच्या मागणीने नवा वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक मंत्री आजम खान यांनी आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहाल हा वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचे सांगून त्याचा ताबा वक्फ बोर्डाकडे देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ताजमहालात पाच वेळचा नमाज अदा करण्यासही परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
आजम खान म्हणाले की, ताजमहाल ची वास्तू राज्याच्या वक्फ बोर्डाची संपत्ती घोषित करून त्याच्या देखभालीची जबाबदारीची जबादारी या संस्थेकडे दिली गेली पाहिजे. आजम खान यांनी १९८० मध्ये पहिल्यांदा ताजमहालचा प्रबंधक होण्यासाठी प्रथम अर्ज दिला होता. ते
सध्या राज्याच्या वक्त प्रकरणांचे मंत्रीही आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या ताजमहालाच्या देखभालीची जबाबदारी केंद्र सरकारअंतर्गत पुरातत्व खात्याकडे आहे.
लखनऊच्या ईदागाह मैदानाचे ईमाम मौलाना खालिद रशीद यांनीही ताजमहाल येथे नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना निवेदन दिले आहे.