आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सपा’च्‍या महिला आमदाराची पतीविरुद्ध तक्रार; प्रियकरासोबत करणार लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : आमदार लक्ष्‍मी यांनी भर रस्‍त्‍यावर त्‍यांच्‍या पतीला चप्‍पलने मारले हाेते. - Divya Marathi
फाइल फोटो : आमदार लक्ष्‍मी यांनी भर रस्‍त्‍यावर त्‍यांच्‍या पतीला चप्‍पलने मारले हाेते.
मुरादाबाद (उत्‍तरप्रदेश) - राज्‍यातील संभल जिल्‍ह्यातील चंदौसी विधानसभा क्षेत्राच्‍या आमदार लक्ष्‍मी गौतम यांनी त्‍यांचे पती दिलीप वैष्णव यांच्‍या विरुद्ध हुंडाबंदी कायद्यान्‍वे तक्रार दिली. दरम्‍यान, आपल्‍या पतीने आपल्‍याला दर महिना 50 हजार रुपये पोटगी द्यावी आणि आतापर्यंत केलेल्‍या मानसिक आणि शारीरिक त्रासाची भरपाई म्‍हणून 5 लाख रुपये द्यावे अशी मागणीही त्‍यांनी केली. लक्ष्‍मी या समाजवादी पक्षाच्‍या तिकिटांवर निवडून आल्‍या होत्‍या. काही महिन्‍यांपासून त्‍यांचे आणि त्‍यांच्‍या पतीचे संबंध ताणल्‍या गेले आहेत. लक्ष्‍मी यांचे पक्षातीलच एका कार्यकर्त्‍यासोबत सूत जुळलेले असल्‍याचा आरोप त्‍यांचे पती दिलीप यांनी केला आहे. त्‍याच्‍यासोबत लग्‍न करण्‍यासाठी आमदार लक्ष्‍मी यांनी हे नाटक रचल्‍याचाही दवाही त्‍यांच्‍या पतीने केला. दरम्‍यान, यापूर्वी आमदार लक्ष्‍मी यांनी भर रस्‍त्‍यात चप्‍पल काढून आपल्‍या पतीला झोडपले होते.
आमदार लक्ष्‍मी आणि दिलीप यांचा प्रेमविवाह

लक्ष्‍मी आणि दिलीप हे दोघेही बदायूं येथील एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्‍या ठिकाणी त्‍यांचे प्रेमसंबंध जुळले. त्‍यातून त्‍यांनी वर्ष 2005 मध्‍ये लग्‍न केले. त्‍यांना आता सात आणि तीन वर्षांच्‍या दोन मुलीही आहेत. लक्ष्‍मी यांनी आरोप केला की, त्‍यांचे पती दिलीप यांचे अगोदरच बुलंदशहरच्‍या एका महिलेसोबत लग्‍न झालेले आहे. मात्र, त्‍यांनी हे लपून ठेवले.
माझ्या पत्‍नीचेच अनैतिक संबंध
दुसरीकडे त्‍यांचे पती दिलीप यांनी आरोप केला की, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मुकुल अग्रवाल यांच्‍यासोबत आपल्‍या पत्‍नीचे अनैतिक संबंध आहे. आक्षेपार्ह स्थितीत मी त्‍या दोघांना पाहिले होते. त्‍याच्‍या सोबत लग्‍न करता यावे, यासाठी तिने आपल्‍यावर आरोप केले आहेत, असा दावा त्‍यांनी केला.
पुढील स्‍लाइडवर पाहा लक्ष्‍मी आणि दिलीप यांचा फोटो....
बातम्या आणखी आहेत...