आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सिंघम' एसपी शिवदीप लांडेंची बिहारमध्ये बुलडोझर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासाराम- बिहारमध्ये रोहतास जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक शिवदीप लांडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या "सिंघम स्टाइल' कारवाईचा धडाका दाखवून दिला. त्यांनी अवैध धंद्यांच्याविरोधात कारवाईचे नेतृत्व करताना जेसीबीचे स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेऊन धडक मोहीम राबवली. या कारवाईत त्यांनी डझनभर क्रशर जमीनदोस्त करुन टाकले, तर मनौरा येथील अवैध कोळसा उद्योग हटवण्यासाठी त्यांनी स्वत: हातात कुदळ घेतली. शिवदीप लांडे हे महाराष्ट्रीयन असून अकोल्याचे आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा एसपी शिवदीप लांडे यांची 'सिंघम स्टाइल'