आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालकिणीला ड्रायव्हरने चाकूने भोसकले, म्हणाला- लग्नाचे वचन देऊन तिने शब्द फिरवला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - शहरात स्पा अँड सलून चालवणाऱ्या महिलेचा तिच्याच जुन्या ड्रायव्हरने खून केला. त्याने चाकूने एवढे वार केले की, चाकू महिलेच्या छातीला चिरत आरपार झाला.  आरोपीने हे कृत्य महिलेचा मुलगा आणि ड्रायव्हरच्या समोरच केले. त्याला ताब्यात घेतल्यावर म्हणाला- माझे तिच्याशी संबंध होते, तिने लग्नाचे वचन दिले पण नंतर शब्द फिरवला. म्हणूनच मी तिचा जीव घेतला.
 
महिलेने ड्रायव्हरविरुद्ध यापूर्वीच दिली होती तक्रार...
- पोलिस सूत्रांनुसार, 36 वर्षीय प्रतिमा ऊर्फ टीना राजावत पारस महाल हॉटेलमध्ये स्पा व सलून चालवत होती.
- शुक्रवारी रात्री टिना तिचा मुलगा आदित्य आणि ड्रायव्हर रौनक जैनसह बाहेर जात होती. यादरम्यान कधीकाळी तिच्याकडे ड्रायव्हरचे काम केलेला नईम त्यांचा पाठलाग करत होता.
- कुमकुम नावाच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पोहोचताच नईम त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला आणि टिनाला म्हणाला की, तू पोलिसात दिलेली तक्रार मागे घे, नाहीतर तुझा ठार मारीन.
- यावर टिनाने त्याला स्पष्ट नकार दिला आणि त्याला येथून चालता हो म्हणाली.
- यानंतर नईमने टिनाच्या छातीवर चाकूने हल्ला केला. यामुळे टिना जागीच कोसळली.
- नईम खून करून पळू लागला तेव्हा अपार्टमेंटच्या चौकीदाराने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. नईमने त्याच्या बाचाबाची केली आणि तेथून पळून गेला.
- अपार्टमेंटच्या लोकांनी टिनाला रुग्णालयात पोहाचवले जेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी नईमला मेवाड रुग्णालयाजवळ ताब्यात घेतले.
- नईमविरुद्ध प्रतिमाने पूर्वीच तीन पोलिस स्टेशनमध्ये तिला त्रास देत असल्याची तक्रार दिली होती. परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...