आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळात वेधशाळा भारत जगात चौथा, उपग्रहांसह अॅस्ट्रोसॅटचे यशस्वी प्रक्षेपण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीहरिकोटा- भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा असणाऱ्या अॅस्ट्रोसॅटचे सोमवारी यशस्वी प्रक्षेपण झाले. पीएसएलव्ही-सी३० या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे अॅस्ट्रोसॅटसह अमेरिकेचे ४, तर कॅनडा व इंडोनेशियाचा प्रत्येकी १ उपग्रहही यशस्वीरीत्या अंतराळात नेण्यात आला. भारताने प्रथमच अशा रीतीने अमेरिकेचे उपग्रह अंतराळात नेले आहेत. अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, रशिया, जपाननंतर चौथा देश ठरला आहे.

अॅस्ट्रोसॅटची वैशिष्ट्ये
वजन : १५१३ किलो, आयुष्य ५ वर्षे, चार एक्स-रे पेलोड्स, एक यूव्ही टेलिस्कोप, एक चार्ज मॉनिटर, एकाच वेळी विविध खगोलीय निरीक्षणे घेण्याची क्षमता, पृथ्वीला ६५० किमीवरून प्रदक्षिणा घालणार, एकाच वेळी अतिनील कमी व उच्च क्षमतेच्या लहरींवर लक्ष ठेवण्याची क्षमता, कृष्णविवरांच्या हालचाली, न्यूट्रॉन ताऱ्यांचा अभ्यास, आकाशगंगेपल्याड तारका समूहांचा अभ्यास करणे आता सुलभ होणार आहे. अतिनील किरणांच्या जगावर होणाऱ्या परिणामाची उकल करणे आता सोपे होणार आहे.