आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेमी हायस्पीड ट्रेन टॅल्गोची दुसरी ट्रायल आज होणार, तब्बल 250 kmph मॅक्झिमम स्पीड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा (उत्तर प्रदेश) - स्पेनकडून खरेदी केलेली सेमी हायस्पीड टॅल्गो ट्रेनची आज दुसरी ट्रायल मथुरा ते पलवल दरम्यान होणार आहे. ट्रायल 26 जुलैपर्यंत सुरु राहील. यावेळी वेगवेगळ्या पातळ्यांवर रेल्वेची चाचणी केली जाईल. त्यानंतर मुंबई आणि दिल्ली दरम्यानही या ट्रेनची ट्रायल होईल. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ताशी 180 स्पीडने ही रेल्वे चालवण्याची तयारी सुरु आहे.
ताशी 250 किलोमीटर पर्यंत वाढवता येईल स्पीड
> टॅल्गो ट्रेनच्या आणखी तीन चाचण्या होणार आहेत. पहिली चाचणी 29 मेला बरेलीमध्ये झाली होती. दुसरी चाचणी मथुरा-पलवलदरम्यान होणार आहे.
> शेवटची आणि तिसरी ट्रायल दिल्ली-मुंबई दरम्यान ऑगस्टमध्ये होईल. तिसऱ्या ट्रायलमध्ये ट्रेनची स्पीड ताशी 250 किलोमीटरपर्यंत वाढवली जाणार आहे.

काय आहे ट्रेनचे वैशिष्ट्य
> या ट्रेनच्या प्रत्येक प्रवाशासाठी ऑडिओ सिस्टम आहे. प्रत्येक सिटजवळ व्हिडिओ पाहाण्यासाठी मॉनिटर आहे.
> प्रवाशांना वाचन करायचे असल्यास प्रत्येक सिटजवळ रिडिंग लँम्प आहे.
> प्रवाशांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फुटरेस्ट लावलेले आहे.
> सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रेनचे सिट हे आरामदायक आहेत.
भारतात सध्या सर्वाधिक वेगवान ट्रेन कोणती
> भारतात सध्या सर्वाधिक वेगवान ट्रेन ही दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणारी गतिमान एक्स्प्रेस आहे. या ट्रेनची स्पीड ताशी 160 किलोमीटर आहे.
> यानंतर क्रमांक लागतो दिल्ली - भोपाळ दरम्यान धावणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसचा.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टॅल्गोचे इंटेरियर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...