आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात-धर्मापेक्षा देशाच्या विकासावर बोला, राजकीय परिवर्तनापेक्षा सामाजिक बदल महत्त्वाचे: योगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी मेरठच्या भैसाली ग्राउंडवर सभा घेतली. आपल्या इतिहासाला न जोपासणारा समुदाय त्याच्या भूगोलाचेही संरक्षण करू शकत नाही, असे या वेळी बोलताना योगी म्हणाले. जात आणि धर्म यापेक्षाही देशाच्या विकासाची चर्चा करण्याचा हा काळ आहे. २०१४ मध्ये तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सत्तासूत्रे सोपवली. ते केवळ देशातील नव्हे तर जगातील लोकप्रिय नेते झाले असल्याचे आपण सर्वजण पाहत आहात. 

उत्तर प्रदेश सरकार देखील अशाच रीतीने काम करू इच्छिते. ‘सबका साथ-सबका विकास’ या तत्त्वावरच मी काम करू इच्छितो, असे योगी आदित्यनाथ या वेळी बोलताना म्हणाले. राजकीय परिवर्तन अपेक्षित नाही. सामाजिक परिवर्तन महत्त्वाचे असल्याचे ते सभेत बोलताना म्हणाले. आम्ही भेदभाव करणार नाही. स्वच्छता सर्वेक्षणाविषयी ते म्हणाले की, ही स्थिती बदलण्याची गरज आहे. प्लास्टिकचा वापर १००% बंद करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नाल्या तुंबणार नाहीत असे ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...