आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Special Facilities For Physically Disabled Persons In Railway Stations Of Country

दिव्यांग व ज्येष्ठांना रेल्वेत विशेष सुविधा, देशातील 10 प्रमुख स्थानकांवर व्हीलचेअर लिफ्टची सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मप्र) - दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वेत चढण्याचा त्रास वाचणार आहे. अशा प्रवाशांना आता व्हील चेअर लिफ्टद्वारे डब्यात पोहाेचवले जाईल. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम लि. जयपूर व ग्वाल्हेरसह देशातील प्रमुख १० स्टेशनवर व्हीलचेअर सुविधा सुरू केली जाणार आहे. या व्हीलचेअर लिफ्टची चाचणी घेतल्यानंतर प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. ४ महिन्यांच्या आत ग्वाल्हेरसह सर्व १० स्थानकांवर उपस्थानक मास्तरांशी संपर्क साधून ही सुविधा घेता येईल. 
 
रेल्वेमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना चढण्यासाठी खूप त्रास होतो.  रेल्वेत चढण्यासाठी गर्दीमध्ये नातेवाइक किंवा कुली त्यांना उचलून डब्यात नेतात. या प्रयत्नात रेल्वे सुटतेसुद्धा.  हा त्रास लक्षात घेता आयआरसीटीसीने ग्वाल्हेरसह शहरातील १० प्रमुख स्थानकांवर अशा प्रकारची सुविधा असेल. चेन्नईतील एका कंपनीने अशा प्रकारची व्हीलचेअर लिफ्ट पुरवठा करण्याचे ठरवले आहे. एका व्हीलचेअर लिफ्टची किंमत २ लाख ९३ हजार रुपये इतकी आहे.  
 
या स्थानकावर असेल सुविधा 
एनसीआरमध्ये व्हीलचेअर लिफ्टची सुविधा फक्त ग्वाल्हेर येथे देण्यात आली आहे. ग्वाल्हेरनंतर जयपूर, गोरखपूर, हजरत निजामोद्दीन, नवी दिल्ली, जुनी दिल्ली, वाराणसी, लखनऊ, मुंबई, गुवाहाटीमध्ये ही सुविधा असेल. या स्थानकांसाठी आयआरसीटीसीने वेगळे समन्वयक अधिकारी नियुक्त केले आहेत.  
 
व्हीलचेअर लिफ्टची सुविधा 
{ व्हीलचेअर लिफ्टमध्ये जॉयस्टिक कंट्रोलर असेल. तो कोणत्याही दिशेने फिरवता येतो.  
{ याचा वेग ताशी ४ किमी इतका असेल. यात इलेक्ट्राॅनिक सर्किट ब्रेक सिस्टिम असेल.  
{ याची बॅटरी कमीत कमी २ तास आणि पूर्णपणे चार्ज करण्यास १२ तास लागतील. या लिफ्टमधून १२० ते २२० किलोपर्यंत वजनाच्या प्रवाशांना लिफ्टने जाता येईल.  
{ ही चेअर हाताने चालवता येईल.  
 
ग्वाल्हेरच्या कंपनीकडून लिफ्टचा पुरवठा
ग्वाल्हेरमध्ये चेन्नई येथील कंपनी व्हीलचेअर लिफ्ट पुरवठा करेल. याची आॅर्डर देण्यात आली आहे. व्हीलचेअर लिफ्टची चाचणी घेतल्यानंतर १२० दिवसांच्या आत प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असेल - अमनकुमार, समन्वयक अधिकारी, आयआरसीटीसी. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...