आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Features About Chittorgarh Fort On Mountain

महाभारत काळातील या किल्ल्यात भीमाने मारलेल्या एका लाथेत तयार झाला तलाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपुर - संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करणारे राजस्थान स्वतःमध्येच रोचक माहिती दडवून ठेवलेले एक राज्य आहे. येथे असलेल्या किल्ल्यांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. महाभारतातील पात्र भीमाने 5000 वर्षांपूर्वी येथे एका किल्ल्याचे निर्माण केले होते, असे मानले जाते. या किल्ल्याचे नाव होते 'चित्तौडगढ किल्ला'. समुद्र तळापासून 1338 फुट उंचीवर 500 फुट उंच एका विशाल पर्वतावर निर्मित हा किल्ला 3 किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर विस्तीर्ण आहे.

चित्तौडगढचा किल्ला भारतातील सर्वात मोठा किल्ला मानला जातो. हा 700 एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे. पांडवांमधील दुसरे भाऊ भीम जेव्हा संपत्तीच्या शोधात निघाले होते तेव्हा रस्त्यात त्यांची भेट एका योगी पुरुषाशी झाली. त्या योगी पुरुषाकडून भीमाने पारस दगडाची मागणी केली. या बदल्यात त्या योगीने एका किल्ल्याची मागणी केली, जो एका रात्रीत बांधलेला असावा.

भीमाने ताकदीच्या आणि भावांच्या मदतीने किल्ल्याचे काम जवळपास पूर्णच केले होते, फक्त थोडेच काम शिल्लक होते. हे काम पाहून योगीच्या मनात कपट उत्पन्न झाले. लवकर सकाळ व्हावी यासाठी त्याने यतिला कोंबड्याचा आवाज काढण्यास सांगितले. ज्यामुळे भीम काम थांबवेल आणि त्याला पारस दगड द्यावा लागणार नाही. कोंबड्याचा आवाज ऐकताच भीमाला खूप राग आला आणि त्याने जोराने एक लाथ जमिनीवर मारली. ज्या ठिकाणी भीमाने लाथ मारली तेथे एक जलाशय तयार झाले. आजही या ठिकाणाला 'भीमलाथ' नावाने संबोधले जाते.

Note:- 11 डिसेंबर, गुरुवारी इंटरनॅशनल माउंटन डे आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला ऐतिहासिक पर्वत स्थळांची माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा पर्वतामध्ये बांधण्यात आलेल्या या किल्ल्याची रोचक माहिती...