आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांसाठी हृदय रुग्णालय, येथे कॅश काउंटरच नाही, मुलांवर मोफत उपचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- छत्तीसगड : नवीन रायपूरमध्ये सत्य साई हार्ट सेंटरमध्ये मोफत उपचार
- तीन वर्षांत झाल्या देशभरातील ७७६ मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया
रायपूर - हृदयाच्या आकाराचे हे रायपूरमधील साई चाइल्ड हार्ट सुपर स्पेशालिटी रुग्णालय देशभरातील चिमुकल्यांसाठी जीवदान ठरले आहे. मुलांच्या हृदयविकारावर येथे उपचार केले जातात. तेही अगदी मोफत. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात कॅश काउंटरच ठेवलेले नाही. एखाद्या खासगी रुग्णालयात हेच उपचार करायचे म्हटले तर किमान ३ ते १० लाख रुपये खर्च येतो.

देशातील १७ राज्यांव्यतिरिक्त नेपाळ, नायजेरिया, पाकिस्तान, बांगलादेशातून रुग्ण येतात. रुग्णाशिवाय त्याच्यासोबत एका नातेवाइकाची राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था येथे आहे. दुसरा नातेवाईक मोफत राहू शकतो, परंतु त्याच्या जेवणाचे पैसे घेतले जातात.
गरज पडल्यास असा करा संपर्क
सोमवार ते शुक्रवार : ९ ते दुपारी ३ पर्यंत ६ रुग्णांची नोंदणी केली जाते.
मो. क्र. ०९४२४२०७१४० व ०७७१-२४४५८०० या क्रमांकांवर संपर्क साधू शकाल.
इमर्जन्सीला प्राधान्य
गंभीर रुग्ण आला तर त्याला तत्काळ दाखल करून घेतले जाते. दिवसातून ३ शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयाची क्षमता ४० बेडची अाहे. सध्या प्रतीक्षा यादी नाही
पुढील स्लाइडवर वाचा, दोन चिमुकल्यांच्या उपचाराबाबत..