आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनाशी वाद घातला नाही तरच तणावांपासून मुक्ती मिळेल : श्री श्री रविशंकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांचा ५९ वा वाढदिवस नुकताच "आनंद उत्सव'च्या रूपात साजरा करण्यात आला. यासाठी जगभरातील सुमारे १ लाख भाविक बंगळुरू आश्रमात पोहोचले. मलाही एका मिनिटाची वेळ मिळाली. दरम्यान संवाद सुरू झाला तर रविशंकर यांनी मला त्यांच्या गाडीत बसण्यास सांगितले. त्यांनी मला सोबत डोंगरावर एकांतात वसलेल्या नर्मदा कुटीत नेले. बोलता बोलता सुमारे सव्वा तासाचा वेळ गेला. त्यांच्या नेहमीच्या हसमुख शैलीत त्यांनी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित भाग खास आपल्यासाठी...
तुमच्यासारखे हसमुख राहण्यासाठी नेमके काय करावे?
(हसतच..) काही नाही..फक्त हसत राहा. इतरांमध्ये चांगुलपणा शोधाल तर सर्व चांगेलच वाटेल आणि चांगले वाटले की हसणारच. तेव्हा आनंदाचाच वर्षाव होईल.

लोक तुम्हाला भरपूर प्रश्न विचारतात? त्यात काय आवडते ?
लोक त्यांच्या आवडीचेच प्रश्न विचारतात. मात्र, कोणी देश किंवा समाजाची चिंता व्यक्त करतो तेव्हा आनंद वाटतो. वेळ किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटबाबतचे प्रश्नही चांगले वाटतात. कारण, याकडे लक्ष देत असल्याची जाणीव प्रश्नातून होते.

दुसऱ्यांत चांगलुपणा कसा शोधावे कारण समाजात लोक इतकेही चांगले नाहीत?
जगात काहीच पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट नसते. विष धोकादायक असले तरी कधीकधी ते जीवदान देणारे ठरते. सर्व जीवनरक्षक औषधी विषारीच आहेत.

तुमचे युवकांना प्रचंड आकर्षण आहे, याचे कारण काय?
वास्तविक युवक सकारात्मक असतात. ते इतरांना आनंद देऊ इच्छितात आणि हेच सकारात्मकतेचे वैशिष्ट्य आहे. ऊर्जा आणि रचनात्मकतेने परिपूर्ण ही युवापिढी आपल्याला आनंद देत आहे. कदाचित मी त्यांच्या मनातील बोलत असावे म्हणून आवडत असेल.

तुम्ही कधी त्रस्तही होत असाल?
त्रासाची जाणीव करणे ही एक मानसिक अवस्था आहे. नकारात्मक विचारच दु:खी करतात. त्यामुळे सकारात्मक विचार करायला हवे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे "हे तर असेच आहे' असा विचार करणे आणि दुसरी म्हणजे "ही वेळही निघून जाईल' यावर विश्वास ठेवणे. असे केल्यास कधीच निराश किंवा दु:खी राहणार नाही.

स्ट्रेस मॅनेजमेंट कसे करावे? आपण सर्वांकडेही वेळ कमी असताना हे कसे साध्य करता येईल?
आपल्या मनाचा द्वेष करू नका. त्याच्याशी भांडा. मी त्रस्त आहे, हे नाही, ते नाही, इतके काम आहे, असे विचारच मनात येऊ देऊ नका. मन या विषयांमागे धावणारच असा विचार करा. त्यास नेहमी माफी दिल्यास मनातील द्वंद्व आपोआप संपुष्टात येईल. मनाशीच वाद नसल्याच मग तणाव येणारच नाही. त्यानंतर वेळेचा अभावसुद्धा कमी होऊन जाईल.

मात्र, अनेकदा अशा बातम्या आल्या आहेत की...?
(मध्येच थांबवत) त्यांची मानसिकता बदलावी लागेल. त्यांना देशप्रेमाशी जोडण्याची गरज असून त्यानंतरच युवकांत सकारात्मकता आणि उत्पादकता वाढीस लागेल.
बातम्या आणखी आहेत...