आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : महाराष्ट्रात 1 लाख 9 हजार रक्त पिशव्यांची नासाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
फाझिल्फा - देशभरातील रक्तपेढ्यांमधून साठवण्यात आलेल्या रक्ताच्या सुमारे ६.६९ लाख पिशव्या  २०१६ मध्ये निकामी ठरल्या. महाराष्ट्रात १ लाख ९ हजार रक्तपिशव्यांची नासाडी झाली; तर पंजाबात हाच आकडा १८ हजार २५३ रक्तपिशव्या इतका आहे. रक्तपिशव्या वाया घालण्यात महाराष्ट्र अव्वल आहे. रक्तपेढ्या आणि रुग्णालये यांच्यात समन्वय नसल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तांच्या पिशव्या निकामी ठरल्याची धक्कादायक माहिती एका माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.  
 
फाझिल्का येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश ठकराल यांनी नॅशनल एड्स नियंत्रण संस्थेकडे यासंदर्भात विचारणा केली होती.  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील आकडेवारी समोर आली. जर या रक्त पिशव्यांची मोजदाद लिटरमध्ये केल्यास सुमारे ५३ टँकर इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त वाया गेले आहे. जर या रक्ताचा सदुपयोग झाला असता तर अनेकांचे जीव वाचले असते. अरुणाचल प्रदेशचा क्रमांक शेवटी येतो. तेथे १०७ रक्ताच्या पिशव्या वाया गेल्या.
 
रुग्णालये आणि रक्तपेढ्यांनी जेथे अावश्यकता भासेल तेथे रक्त पाठवावे  : माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, देशात रक्त पेढ्यांच्या यंत्रणांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. रक्तपेढ्या आणि रुग्णालये यांच्यात आपापसांत समन्वयाचा अभाव आहे.  जेव्हा एखाद्या रक्तपेढीत रक्ताची कमतरता असेल तर त्याचवेळी दुसऱ्या रुग्णालयात रक्त शिल्लक असते. पण त्यांच्यातच समन्वय नसल्याने अनेकदा साठवलेले रक्त निकामी ठरते. 
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,कोणत्याही रुग्णालयात जर रक्त साठवण्याचा अवधी २५ दिवसांपेक्षा जास्त होत असेल तर त्यांनी दुसऱ्या रुग्णालयाशी संपर्क साध्ून ते रक्त पाठवून दिले पाहिजे.  
 
जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी  : राजेश ठकराल यांनी सांगितले, जर तुम्ही शिबिरामध्ये रक्तदान करत असाल तर ते शिबिर योग्य प्रकारे आयोजित केले जाते की नाही. रक्त कोठे साठवले जाते. शिबिराचे आयोजन कोणी केले आहे आणि ते रक्त कोठे जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधल्यास तुम्ही रक्ताची नासाडी वाचवू शकता. या नासाडीसाठी जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हायला हवी.
 
कोणत्या राज्यात किती रक्त निकामी ठरले  : महाराष्ट्र १०९०५३, अंदमान आणि निकोबार ८६ पिशव्या, आंध्र प्रदेश २३५६३, अरुणाचल प्रदेश १०७, आसाम ५५३८, बिहार ८७०५, चंदिगड २२७८, छत्तीसगड ७६५०, दादरा आणि नगर हवेली १५३४, दिल्ली ४८४३६, गोवा ३४०९, गुजरात ५४३०९. 
बातम्या आणखी आहेत...