आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोटोग्राफरने दाखवली मुंबई-दिल्लीतील स्लमपासून बॉलिवूडपर्यंतची रियल इंडियन ब्यूटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये लोकल ट्रेनची वाट पाहात असलेली एक मराठी मुलगी आणि दुसऱ्या फोटोत निर्वासित कँपमधील एक तरुणी. - Divya Marathi
मुंबईमध्ये लोकल ट्रेनची वाट पाहात असलेली एक मराठी मुलगी आणि दुसऱ्या फोटोत निर्वासित कँपमधील एक तरुणी.
19 ऑगस्ट - 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' आहे. जगभरातील फोटोग्राफर्सच्या अतुलनीय कामगिरीला सलाम करण्याचा हा दिवस. या निमीत्ताने रोमानियाच्या महिला फोटोग्राफर माएला नोरोस यांनी 'इंडियन ब्यूटी' थीमवर तयार केलेली फोटो सीरिज divyamarathi.com घेऊन आले आहे. यात पुण्यापासून पुष्करपर्यंत आणि आर्थिक राजधानी मुंबईपासून देशाची राजधानी दिल्लीपर्यंतच्या झोपडपट्टीपासून बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यात आले आहे.

हे आहे 'इंडियन ब्यूटी' फोटो सीरिजचे वैशिष्ट्य
- फोटो सीरिजमध्ये माएला नोरोसने महिलांची रियल ब्यूटी कॅमरात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे.
- यात स्लम एरियात राहाणाऱ्या महिलांपासून बॉलिवूड ब्यूटीजचा समावेश आहे.
- नोरोसने ही फोटोग्राफी दिल्ली, पुष्कर, अमृतसर, वाराणसी आणि महाराष्ट्रातील मुंबई व पुण्यात केली आहे.
- या प्रोजेक्टसाठी माएलाने जवळपास सहा महिने भारतात मुक्काम केला होता. तिने 200 पेक्षा जास्त महिलांचे फोटो घेतले होते.

भारतीय महिलांबद्दल काय म्हणाली नोरोस
- याबद्दल नोरोसने सांगतले, की भारतात आजही अशा महिला आहेत ज्यांना भेदभाव आणि रोजच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासोबतच त्यांच्यामध्ये शक्ती आणि सौंदर्य़ाचा अनोखा मिलाफ असतो.
- या फोटोमध्ये तुम्हाला महिलांचे बाह्य सौंदर्य माएलाने टिपले असे दिसत असले तरी, तिचे म्हणणे आहे की भारतीय महिलांच्या आंतर्बाह्य छटा टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
- माएलाच्या या प्रयत्नाचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.

कोण आहे माएला नोरोस
- 30 वर्षांची माएला रोमानियाच्या बुखारेस्ट येथील टुरिझम फोटोग्राफर आहे.
- 3 वर्षांपासून ती जगातील विविध देशांमध्ये फिरून तिथले सौंदर्य कॅमेरात कैद करत आहे.
- माएलाने वयाच्या 17 व्या वर्षी फोटोग्राफी सुरु केली होती. तिचे वडील पेंटर होते.
- तिच्या हॉबिज आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी तिने अनेक क्षेत्रात काम केले.
- 27 व्या वर्षी तिला वाटले की आपले साचेबद्ध आयुष्य सोडून आता ट्रॅव्हलिंग आणि फोटोग्राफीला अधिक वेळ दिला पाहिजे, त्यासाठी ती जगाच्या सफरीवर निघाली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माएला नोरोसने कॅमेरात कैद केलेली 'इंडियन ब्यूटी'

(Pls Note- - तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...