आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताच्या प्रत्येक चालीवर पाकची नजर, आपण मात्र सर्व पाहूनही शांतच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानी सैन्याने झा़डांवर चौकी तयार करून (वर्तुळातील) भारताच्या हलाचालींवर नजर ठेवायला सुरुवात केली आहे.)
अबदुलिया पोस्ट (आरएसपुरा सेक्टर) - आपल्या प्रत्येक हालचालीवर शत्रूची नजर आहे. पण आपण ठरवूनही ते पाहू शकत नाही, अशी अवस्था आहे. 16 जुलैला आरएसपुरा सेक्टरच्या पोस्टवर बीएसएफ जवान संजय धर याला स्नायपर शॉट लागला होता. म्हणजे कोणी तरी त्याला सहज लक्ष्य केले होते. पाकिस्तानसाठी असे करणे सहज शक्य आहे. पण आपल्यासाठी नाही. कारण पाकिस्तानने लपून वार करण्यासाठी त्यांच्या भागात एक ग्रीन वॉल तयार केली आहे.

भारतीय चौक्या उघड, त्यांच्या मात्र छुप्या
1971 वर्यंत दोन्ही देशांमध्ये झीरो लाईनपासून 150 मीटरपर्यंत चौकी तयार होणार नाही असा करार होता. पण गेल्या काही वर्षात पाकिस्तानने 150 मीटरच्या आतही बंकर तयार केले आङेत. ते दिसत नाहीत. आपल्या चौक्या मात्र सहज नजरेस पडतात.

ग्रीन वॉल कुठे कुठे
अखनूरच्या परगोवाल सब सेक्टर, आरएसपुराच्या अबदुलिया, कानाचक्क, पिंडी पोस्ट, पीतल पोस्ट, रामगड सेक्टर सांबा सेक्टर अशा अनेक परिसरात.

भारताला धोका
फायरिंग झाल्यास पाकिस्तानी सैनिक सहज भारतीय सैनिकांना लक्ष्य करतात. भारतीय सैनिकांना ते शक्य होत नाही. भारतीय गुप्तचर संस्था सॅटेलाईटच्या मदतीनेही व्यवस्थित लक्ष ठेवण्यास यशस्वी होत नाहीत. आयएसआय याच भींतीच्या मदतीने दहसतवाद्यांना आत घुसवते. ते दहशतवाद्यांना कव्हर देण्यासाठी फायरिंग करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTO...