आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 हजार वर्षांपूर्वी जिथे चालायच्या कृष्णलीला, ती 10 ठिकाणे आज अशी दिसतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा - जगभरात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. पाच हजार वर्षांपूर्वी लीलाधर भगवान श्रीकृष्णाने मथुरेतच त्यांच्या बाललीला दाखविल्या होत्या. आता त्या जागा पूर्णपणे बदलल्या आहेत. आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्त divyamarathi.com या कृष्णाचे अस्तत्वि राहिलेल्या ठिकाणांची ओळख करुन देणार आहे.

कंसाने तयार केलेल्या तुरुंगाचे आता झाले मंदिर
- भगवान श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या तुरुंगात झाला होता.
- असे म्हटले जाते की आजही त्या तुरुंगांचा काही भाग अस्तित्वात आहे.
- या ठिकाणी फोटोग्राफीला बंदी आहे, मात्र भक्तांना तिथे जाता येते.
- त्याच्याच बाजूला एक मोठे मंदिर बांधण्यात आले आहे. हे पाचव्यांदा बांधण्यात आले आहे.
- चार वेळा या मंदिरावर आक्रमण झाले आणि ते पाडण्यात आले होते.

येथे चालायच्या कृष्णाच्या रासलीला
- निधिवन नावाच्या वनात राधा आणि कृष्णाच्या रासलीला चालत.
- असे म्हटले जाते की रात्रीच्या वेळी राधा या वनात येत असे आणि कृष्णासोबत रास चालत होता.
- आता वनात तयार करण्यात आलेल्या भवनात कृष्णलीला चालतात.
- रात्री मात्र येथे जाण्यास बंदी आहे.
- अस म्हटले जाते की रात्री कोणी रासलीला पाहिल्या तर त्यांची दृष्टी जाते.

कृष्ण असा जात होता यमूनेपार वृंदावनात
- श्यामवनात 16 वटवृक्ष आहेत. ते सर्व एकाच वंशांचे आहेत.
- पाच हजार वर्षांपूर्वी वटवृक्षाच्या फांद्या फार मोठमोठ्या होत्या.
- या फांद्या यमुनेला पार करुन वृंदावनापर्यंत जात होत्या.
- कृष्ण या फांद्यांवरुन वृंदावनात जात होता.
- आजही येथे वृंदावनाच्या दिशेने झुकलेल्या मोठ्या फांद्या आहेत.

जन्मानंतर येथे आणले होते श्रीकृष्णाला
- श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या तुरुंगात झाल्यानंतर वासूदेव कान्हाला टोपलीत घेऊन गोकुळातील नंदनवनात पोहोचले होते.
- असे म्हटले जाते की आजही पाच हजार वर्षांपूर्वीचे नंदनवन आहे.
- याच ठिकाणी आता मंदिर आहे, तिथे भक्तांची रिघ लागते.

पूतना वध स्थळाचे झाले शेत
- कृष्णाला मारण्यासाठी कंसाने पाठवलेली राक्षसनी पूतना हिचा कान्हाने वध केला होता.
- पूतनाचे शरीर अवाढव्य होते. कित्येक किलोमीटर लांब ते शरीर होते.
- तिला मारल्यानंतर तिच्या शरीरातून सुगंध दरवळत होता.
- ब्रिजवासींनी तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करुन त्यावर अंत्यसंस्कार केले होते. तेव्हा संपूर्ण गोकूळात सुगंध होता.
- आता त्या ठिकाणी शेती आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कृष्णलीलांची 10 स्थळे आज कशी दिसतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...