आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेक्स वर्करच्या भुमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती ही अभिनेत्री, राष्ट्रीय पुरस्कारावर कोरले नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिल्म 'चेतना'चे हे पोस्टर अतिशय चर्चेचा प्रसिद्ध झाले होते... - Divya Marathi
फिल्म 'चेतना'चे हे पोस्टर अतिशय चर्चेचा प्रसिद्ध झाले होते...

इलाहाबाद- दिग्दर्शक बीआर इशारा यांची फिल्म 'चेतना' (1970) मध्ये लहान वयाच्या सेक्स वर्करची भुमिका करून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रेहाना सुल्तानचा जन्म 19 नोव्हेंबरला होता. इलाबादच्या शहागंच परिसरात राहणाऱ्या रेहाना सुल्तानने हमीदिया इंटर कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. divyamarathi.com ने तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी तिची मैत्रीन अनीश इकराम (रहमान)ची भेट घेतली आणि चर्चा केली. अनीशा सहावीपासून ते कॉलेजचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत रेहानासोबत शिकली आहे. दोघींमधी मैत्री अतिशय घट्ट होती.


कॉलेजच्या गॅदरींगमध्येही नव्हती घेत भाग...
- अनीशाने सांगितले की, रेहाना आणि माझी सहावीपासून मैत्री होती. 12 वीपर्यंत आम्ही सोबतच शिक्षण घेतले. रेहाना आभ्यासात साधारन होती.
- कॉलेजच्या कोणत्याच कार्यक्रमात रेहाना सहभागी होत नव्हती आणि गॅतरींगमध्येही तिची कोणतीच भुमिका नव्हती.
- तिचे कुटुंब शाहगंजच्या पत्थर गल्लीत राहत होते. कॉलेजमध्ये असताना मी एकदा रेहानाच्या घरी गेले होते. छोड्या गल्लीत एक सामान्य घर होते. घराकडे पाहून कोणी कल्पना देखील करू शकत नव्हते, की या घरातील मुलगी फिल्ममध्ये काम करेल. तिचे वडिल इलेक्ट्रॉनीक साहित्य विकण्याचे काम करत होते.
- त्यावेळे छोट्या शहारातील मुलींनी फिल्ममध्ये काम करण्याचा विचार करणे ही खूप मोठी बाब होती. परंतु, त्यावेळी मुंबईचा एक व्यक्ती तिच्या मागे लागलेला होता. तो तिला फिल्ममध्ये काम देण्याविषयी सांगत होता.


12वी नंतर मुंबईला आली रेहाना....
- रेहानाने ना कधी अभिनय शिकली होती, ना कधी नाटकात काम केले होते. त्यावेळी कॉलेजमध्ये मी(अनीशा) खूप फेमस होते आणि प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत होते. आवजही चागंला होता.
- रेहाना मलाही मुंबईला येणासाठी अग्रह करत होती. तुझा आवाज खुप छान आहे आणि तु दिसायला देखील खुप सुंदर आहेस, आप दोघी मुंबईत अॅक्टींग करू, अशी ती मला म्हणत होती. परंतु, आमच्या घरात फिल्ममध्ये काम करण्याचा विराच करणे ही खूप मोठी बाब होती. रेहाना 12वी नंतर लगेच निघून गेली होती.


कोन आहे रेहाना....
- 19 नोव्हेंबर 1950 ला इलाहाबदमध्ये जन्मलेली रेहानाने पुणे FTII मधून अभिनयाची पदवी घेतली आहे.
- 1967 मध्ये अभिनयाची पदवी मिळाल्यानंतर तिला विश्वनाथ अयंगरची डिप्लोमा फिल्म 'शादी की पहली सालगिरह'मध्ये काम करण्याची संधी मिळाली.
- यानंतर दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांनी 1970 मध्ये तिला  'दस्तक' या फिल्ममध्ये भुमिका दिली. रेहाना FTII पास अशी अभिनेत्री होती, जिला कोणत्याही फिल्ममध्ये लीड रोल मिळत होता.
- रहानाला फिल्म 'दस्तक'साठी बेस्ट अभिनेत्री कॅटेगरीत राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.
- यानंतर रेहानाने आणखी काही फिल्म केल्या, यात 'हार-जीत' (1972), 'प्रेम पर्वत' (1973) और 'किस्सा कुर्सी का' (1977) या फिल्मचा समावेश होता.

 

पुढील स्लाइडवर वाचा, रेहाना कशी बनवत गेली सेक्स आयकॉन....

बातम्या आणखी आहेत...