बंगळुरू - देशातील पहिल्या इंटरनेट डी-अॅडिक्शन क्लिनिकमध्ये आठ महिन्यांत ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. २९ जण १४ ते २५ वयोगटातील आहेत. "भास्कर'ने टेक अॅडिक्ट लोकांशी व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला तेव्हा सोशल मीडिया, कॉम्प्युटर गेमच्या आहारी गेलेल्यांच्या एकेका उदाहरणांतून दाहक सत्य पुढे आले.