आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Special Task Force Of Kolkata Police Has Arrested Six Jamaat Ulmujahideen Bangladesh Jmb Terrorists

नेटवर्क उद्ध्वस्त: जमात-उल-मुजाहिदीनचे सहा अतिरेकी अटकेत, तीन बांंगलादेशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- कोलकात्याच्या विशेष तपास पथकाने सोमवारी जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेशच्या(जेएमबी) सहा अतिरेक्याच्या मुसक्या आवळल्या. त्यातील चार 2014 च्या खागरगड स्फोट प्रकरणात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये वाँटेड होते. सहापैकी तीन अतिरेकी मूळ बांगलादेशच्या वंशाचे आहेत. अन्य तीन भारतीय असल्याची माहिती सहआयुक्त(गुन्हे) विशाल गर्ग यांनी दिली.

खगरगडच्या स्फोटानंतर संबंधित अतिरेकी पश्चिम बंगालमध्ये नव्हते. ते दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात राहत होते. दक्षिण भारतात काही विध्वंसक कृत्य करण्याच्या कामात ते गुंतले होते. याबाबतची विस्तृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे गर्ग यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये जेएमबीचा बंगाल शाखेचा म्होरक्या अन्वर हुसेन फारूक ऊर्फ इनाम, राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा हस्तक युसूफ शेख ऊर्फ मौलाना शेख यांचा समावेश आहे. सहा जणांवर भादंवि कलम १२०(गुन्हेगारी कट रचणे), १२१(भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे) आदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांची ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

एनआयएने शेख याच्या शिरावर दहा लाख, कलाम रुबेलच्या शिरावर अनक्रमे लाख एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.

अतिरेक्यांकडून मोबाइलचा वापर नाही :
संबंधितांनी परस्परांशी संपर्क साधण्यासाठी वेबआधारित नेटवर्किंग प्रणालीचा वापर केला. त्यांनी संपर्कासाठी मोबाइल फोन, फेसबुक किंवा मेसेंजरचा वापर केला नाही. परस्पर संपर्कातील इन्क्रिप्टेड संदेश प्राप्त केल्याचा दावा गर्ग यांनी केला. ऑक्टोबर २०१४ रोजी खगरगड येथील स्फोटात वाँटेड आरोपी शहिदुल इस्लाम ऊर्फ सूर्या, मोहंमद रुबेल, अब्दुल कलाम जहिदुल इस्लाम यांचा अटकेतील अतिरेक्यांमध्ये समावेश आहे. अन्वर हुसेन फारूक, मोहंमद रुबेल जहिदुल हे बांगलादेशमधील जमालपूरचे रहिवासी आहेत. अन्य तिघांमध्ये युसूफ वर्धमान जिल्ह्यातील मंगलकोट, सहिदुल इस्लाम अब्दुल कलाम हे आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...