आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायस्पिड कार 8 फुट हवेत उसळली, झाले दोन तुकडे, 4 विद्यार्थी जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- येथील साऊथसिटी रोडवर हायस्पिड कार रस्त्यातील एका दगडाला धडकली. हवेत तब्बल 8 फुट उंच उसळली. त्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. यात कारचे दोन तुकडे झाले. यावरुन कारची स्पिड किती असेल याचा अंदाज येतो. या दुर्घटनेत दोन मुली आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
 
पार्टीचा केला होता प्लॅन
- चौघांनी शुक्रवारी सकाळी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता. दुपारी 1 वाजता त्यांनी होंडा सिटी कार घेतली. संयम याच्या मालकिची कार होती. गौरीश ती चालवत होता.
- एका धाब्याहून त्यांनी चार बिअरच्या बॉटल घेतल्या. कारमध्येच चौघे ड्रिंक करत होते.
- दुपारी सव्वादोनच्या सुमारास कारने ते देतवाल गावाजवळ आले. यावेळी कार रस्त्यात असलेल्या एका दगडावर आदळली. कारची नियंत्रण चुकले. त्यानंतर कार चक्क 8 फुट उंच हवेत उसळली.
- अशीच हवेत असताना झाडावर जावून आदळली. यात कारचे दोन तुकडे झाले.
 
मृतदेहांच्या चिंधड्या
- अपघात एवढा भयंकर होता की कार चालविणाऱ्या गौरशचे शीर झाडाच्या खोडावर चिकटले होते.
- एक मुलीचा हात सांध्यापासून बाहेर आला होता. एका मुलाचे शीर उलटे झाले होते तर पाय विलग झाले होते.
- ही कार 150 च्या स्पिडने जात होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
- अरोडा गाझियाबाद येथील एका कॉलेजमधील बी-टेकचे हे विद्यार्थी आहेत.
 
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाचे विदारक फोटो....
बातम्या आणखी आहेत...