आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 वर्षांच्या मुलाला ट्रकने दिली धडक, आतडे बाहेर पडले, सुदैवाने जीवित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राची (झारखंड)- राची-पाटणा हायवेवर एका भरधाव ट्रकने 13 वर्षांच्या मुलाला जोरदार धडक दिली. त्यानंतर सुमारे 50 मीटर त्याला फरफटत नेले. यात मुलाच्या पोटाचे आतडे बाहेर पडले. सुदैवाने तो जीवित आहे. पण अपघातानंतर बराच वेळा तो रोडवर पडून होता. कुणीच त्याला मदत केली नाही.
हायवे पार करताना झाला अपघात
- आशिषला हायवे पार करायचा होता. धडक दिल्यानंतर मुलाच्या शरीराचा एक भाग ट्रकमध्ये अडकून होता. ट्रक जागेवर थांबला नाही. त्यामुळे सुमारे 50 मीटर तो फरफटत गेला.
- अपघात झाल्यानंतरही त्याच्या मदतीला कुणी आले नाही. अपघातस्थळापासून जवळच त्याचे घर आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर त्याचे नातलग घटनास्थळी आले.
- त्यांनी रोड जाम केला. ट्राफिक रोखून धरली. पण पोलिसांनी त्यांची समजूत काढत मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- सुदैवाने मुलगा बचावला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याला वाचविण्यासाठी डॉक्टर सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा.... कशी घडली घटना.... काय काय झाले....
बातम्या आणखी आहेत...