आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spend 100 Crores And Become Rajyasabha Member Claims Congress Leader

100 कोटी रुपयांमध्‍ये मिळवा राज्‍यसभेचे सदस्‍यत्वः कॉंग्रेसच्‍या खासदाराचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- राज्‍यसभेचे सदस्‍य होण्‍यासाठी 100 कोटी रुपये खर्च होतात, असा खळबळजनक दावा कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस आणि हरियाणातील नेते चौधरी वीरेंद्र सिंग यांनी केला आहे. यमुनानगर येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी हा खळबळजनक दावा केला.

वीरेंद्र सिंग हे हरियाणातून राज्‍यसभेवर गेले आहेत. वीरेंद्र सिंग म्‍हणाले, की 100 कोटी रुपयांमध्‍ये राज्‍यसभेचे सदस्‍यत्व मिळू शकते. मला एकाने सांगितले, की राज्‍यसभेचे सदस्‍य होण्‍यासाठी 100 कोटी रुपये लागतील. परंतु, त्‍याचे काम 80 कोटी रुपयांमध्‍येच झाले. 20 कोटी रुपये वाचले. जिथे जागा मिळण्‍यासाठी 100 कोटी रुपये खर्च करण्‍यात येतात, असे लोक गरिबांचा विचार करतील का, असा सवालही त्‍यांनी केला.

वीरेंद्र सिंग यांच्‍या गौप्‍य स्‍फोटानंतर भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसवर कडाडून टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते प्रकश जावडेकर म्‍हणाले, वीरेंद्र सिंग स्‍वतःचाच अनुभव सांगत आहेत. त्‍यांच्‍या वक्तव्‍याची चौकशी व्‍हायला हवी. सत्ताधा-यांचे राजकारण किती खालच्‍या स्‍तराला गेले आहे, हेच यातून दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी निवडणूक जिंकण्‍यासाठी 8 कोटी रुपये खर्च केल्‍याचे सांगितले होते. त्‍यांच्‍या वक्तव्‍यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. निवडणूक आयोग आणि प्राप्‍तीकर खात्‍याकडून त्‍यांची चौकशी सुरु करण्‍यात आली आहे.