आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महलात राहत होत्या फक्त स्त्रीया, 1 हजार महिलांसाठी बनवले होते 2 स्वीमिंग पूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहाज महल - Divya Marathi
जहाज महल
1 नोव्हेंबरला मध्य प्रदेशचा स्थापना दिवस अत्यंत जल्लोशात साजरा करण्यात येतो. या निमित्ताने divyamarathi.com येथील इतिहास, संस्कृती, कला, विकास आणि अनेक न ऐकलेल्या कथा तुम्हाला सांगत आहोत. आज आम्ही सांगत आहोत, माडू येथील जहाज महल किल्याविषयी...
 
इंदूर- मांडू येथील जहाज महलाचे जसे नाव आहे, त्याचे दृष्य देखील तसेच आकर्षक आहे. मध्य प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांच्या पसंतीच्या स्थळामध्ये जहाज महलाला नक्की स्थान असते. दोन्हीकडून तलाव असलेला हा महल जहाजाच्या आकाराचा बनवण्यात आला आहे, त्यामुळे त्याला जहाज महल असे नाव देण्या आले आहे. हा महल केवळ महिलांना राहण्यासाठी बनवण्यात आला होता. 
 
जहाज महल इंदूरपासून 90 किलोमीटर अंरावरील माडू येथे आहे. जहाज महल दोन तलावांच्या माध्ये बनवण्यात आल्याने तो पाण्यात असल्याचा भास होतो. मुंज आणि कपूर नावाच्या दोन तलावांच्या मध्ये हा महल बनवण्यात आला आहे. महलाच्या दोन्ही दिशेने बनवण्यात आलेले तलाव उन्हाळ्यात महल थंड ठेवण्याचे काम करतात. तसेच महलाच्या दोन बाजूंनी मोठी बाग बनवण्यात आली आहे.

या महलाची निर्मीती 1469-1500 च्या दरम्यान करण्यात आली होती. हा महल खासकरून महिलांना राहण्यासाठी बनवण्यात आला होता, त्याला हरम महल असे संबोधण्यात येत होते. या महलात हजार पेक्षा अधिक महिला राहत होत्या असे सांगितले जाते. 120 मीटर लांब असलेला हा महल आफगानिस्तानहून आलेल्या आर्किटेक्चर्सकडून बनवून घेण्यात आला होता.

महलात दोन स्विमिंग पूल...
- जहाज महलात दोन स्वीमिंग पूल आहेत. एक पहिल्या मजल्यावर, तर दुसरा छतावर बांधण्यात आला आहे. कमळाच्या आकाराचा बनवण्यात आलेल्या या पूलात,  जवळपास 30 हजार लीटर पाणी भरता येऊ शकते. त्यामुळे या महलाला कमलकुड देखील म्हटले जाते. महलात अनेक विहिरी आहेत. यातील एक उजाला नावाची विहिर पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाते.

ग्यारसुद्दीन खिलजी ने बवलेल्या या महलाच्या निर्मीतीमध्ये चूना, गुळ, उडीद दाळ, रेती आणि सुरखी यांचा वापर करण्यात आला संस्कृती मंत्रालयाच्या आदर्श स्मारक योजनेत जहाज महलाचा समावेश करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडवर पाहा जहाज महलाचे फोटोज्....
बातम्या आणखी आहेत...