आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जीने इशार्‍यात दिली लग्नाची बातमी, म्हणाला - भांगडा करण्यासाठी तयार राहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गीता बसरासोबत हरभजन सिंग (फाइल फोटो) - Divya Marathi
गीता बसरासोबत हरभजन सिंग (फाइल फोटो)
जालंधर - टीम इंडियाचा ऑफ स्पिनर गोलंदाज हरभजनसिंग लवकरच बोहल्यावर चढणार आहे. शुक्रवारी भज्जीने 35 वा वाढदिवस साजरा केला, तेव्हाच त्याने लग्नात भांगडा करण्यासाठी तयार राहा असे मित्रांना सांगितले. कित्येक दिवसांपासून कसोटी पासून दूर असलेल्या हरभजनसिंगची गेल्या महिन्यात कसोटी पदार्पण झाले. झिम्बॉव्बे दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.
भज्जीने स्वतः केला खुलासा
सूत्रांच्या माहितीनूसार, जालंधर येथील छोटी बिरादरी येथे झालेल्या बर्थडे पार्टीत भज्जीने स्वतः आपल्या मित्रांना इशाऱ्या-इशाऱ्यात लग्नाची गोड बातमी दिली. तो म्हणाला, 'मित्रांनो, लग्नात भांगडा करण्यासाठी तयार राहा.' विशेष म्हणजे भज्जीची गर्लफ्रेंड गीता बसराचा 'सेंकड हँड हसबंड' चित्रपट त्याच दिवशी रिलीज झाला. या चित्रपटात हरभजनचा गेस्ट अॅपरन्स आहे.
सचिन तेंडुलकर - अभिषेक बच्चनने दिल्या शुभेच्छा
हरभजन सिंगला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना बॉक्सर विजेंदर सिंह, अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री गीता बसरा हिने शुभेच्छा दिल्या. हरभजन आणि गीता यांनी त्यांच्या रिलेशनशिपचा खुलासा अजून केलेला नाही, मात्र भज्जीचे जवळचे मित्र गीताला 'भाभीजी' म्हणतात. कपील शर्माच्या शो मध्ये दोघे उपस्थित होते.