आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पोर्ट‌्‌स कोटा आरक्षण पूर्णत: असंवैधानिकच, फेरविचार करा : हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - स्पोर्ट‌्‌स कोट्यातील आरक्षणाला कोणताही संवैधानिक आधार नसून शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करू शकत नाहीत अशांची सोय लावणे हाच याचा हेतू असल्याने फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे हैदराबाद हायकाेर्टाने म्हटले आहे.

न्या. व्ही. रामासुब्रमण्यम आणि न्या. अनिस यांच्या पीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, क्रीडा, एनसीसीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचा संविधानाने दिलेल्या हमीमध्ये समावेश नाही. हे आरक्षण मागासवर्गीयांना संविधानाने हमी दिलेल्या आरक्षणात आडवा पाय मारण्यासाठी काढलेली पळवाट असल्याचेच प्रत्यक्षात दिसून येते, असे आधीच्या प्रकरणांतही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
बातम्या आणखी आहेत...