आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोएडा : इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गर्ल्स हॉस्‍टेलच्या टॉयलेटमध्ये सापडला SPY CAM

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र प्रतिकात्‍मक)

नोएडा - सेक्‍टर-62 मध्ये जेएसएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या गर्ल्‍स हॉस्टेलच्या विद्यार्थिनींना टॉयलेटमध्ये स्पाय कॅमेरा लावलेला आढळला. त्यानंतर विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाकडे या प्रकाराची तक्रार केली. कॉलेज प्रशासनाने व्हिडिओ क्लीप तयार केल्याचा आरोपही लावला. ही बातमी पसरताच कॅम्पसमध्ये हंगामा सुरू झाला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले. यावेळी माध्यप्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला होता.

असे समोर आले प्रकरण
गुरुवारी एक विद्यार्थीनी जेव्हा टॉयलेटमध्ये गेली तेव्हा एका विचित्र दिसणा-या वस्तूवर तिची नजर गेली. तीने त्याची तपासणी केली त्यावेळी तो स्पाय कॅमेरा असल्याचे लक्षात आले. तिने सर्वांना हे प्रकरण सांगत सगळ्या मुलींना एकत्रित गोळा केले. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनी हॉस्टेलबाहेर येऊन वॉर्डनच्या विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारात वॉर्डनचा सहभाग असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे वॉर्डनच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. या प्रकारानंतर विद्यार्थिनींनी हॉस्टेलबाहेर निदर्शने केली.
तीन कॅमेरे दोन मेमरी कार्ड जप्त
या कॅमे-यांच्या मदतीने व्हिडिओ क्लिपही तयार करण्यात आली असल्याचा विद्यार्थिनींचा आरोप आहे. या प्रकारानंतर हॉस्टेलमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी दोन मेमरी कार्ड आणि कॅमेरा जप्त केला आहे. पोलिस पोहोचण्याआधी कॅमे-याचील सीमकार्ड तोडून टाकण्यात आले होते.