आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lankan Under 15 Cricket Team Sent Home From Chennai

श्रीलंका U-15 क्रिकेट संघाचा चेन्नईत बेरंग, काही तासांतच कोलंबोला परत पाठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - श्रीलंकेच्या अंडर-15 क्रिकेट संघाला सुरक्षेच्या कारणास्तव परत पाठवण्यात आले आहे. चेन्नईत 4 ते 7 ऑगस्ट दरम्यान होत असलेल्या जे. एम. हरुन क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ रविवारी रात्री दाखल झाला होता. मात्र, तत्काळ त्यांना कोलंबोला परत पाठवण्यात आले आहे.
चेन्नई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले, की श्रीलंकेचा 16 खेळाडूंचा संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवारी रात्री चेन्नईत दाखल झाला होता. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी नाकारण्यात आली आणि कोलंबोला परत पाठवण्यात आले.
श्रीलंकन लष्कराच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित एका लेखाने 'How meaningful are Jayalalitha's love letters to Narendra Modi?' (जयललितांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या प्रेमपत्राचा अर्थ? ) मोठे वादळ उठले होते. त्यानंतर करण्यात आलेली ही मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे.

श्रीलंकेच्या विरोधात तामिळनाडूत अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर श्रीलंकेने मोदी आणि जयललिता यांची माफी मागितली होती. मात्र, या प्रकरणाचा श्रीलंकन खेळाडूंना परत पाठवण्याशी काही संबंध आहे, की नाही हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
2012 मध्ये फुटबॉल संघ परत पाठवला
श्रीलंकन संघाला चेन्नईतून परत पाठवण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी 2012 मध्ये मैत्रीपूर्ण समान्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या फुटबॉल संघाला जयललितांनी परत मायदेशी पाठवले होते.
जयललितांना दावा होता, की श्रीलंकेत तमिळींवर अत्याचार सुरु असताना श्रीलंकेच्या सैन्याला भारत प्रशिक्षण का देत आहे. याविरोधात त्यांनी फुटबॉल संघाला परत पाठवले होते.
2011 मध्ये श्रीलंकेचा संघा विजेता
दक्षिण भारतात क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठी जे.एम.हरुन चषकाचे आयोजन केले जाते. यात श्रीलंकेचा संघ नेहमी सहभागी होत असतो. 2011 मध्ये झालेल्या अंडर-16 स्पर्धेत श्रीलंकेने पद्दुचेरी संघाला मात देत स्पर्धेवर नाव कोरले होते. ही स्पर्धा क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया आणि तामिळनाडूच्या ए.एम.एन. ग्लोबल प्रोजेक्ट अंतर्गत आयोजित केली जाते. यात तामिळनाडू,हरियाणा, बिहार, महाराष्ट्र, हैदराबाद, मुंबई, आंध्र प्रदेश, पुणे आणि चेन्नईचा संघ सहभागी होतो. याशिवाय मलेशिया आणि बांगलादेशाचाही संघ या स्पर्धेसाठी येत असतो. या स्पर्धेचा उद्देश आशिया खंडातील शोषित आणि वंचित मुलांच्या क्रिकेट गुणांना प्रोत्साहन देण्याचा आहे.
या स्पर्धेत वन-डे क्रिकेट एवजी 30 - 30 षटकांचे सामने होतात. 12 संघांचे चार-चारचे गट तयार केले जातात. गेल्या वर्षी ही स्पर्धा चंदीगडमध्ये आयोजित करण्यात आली होती. येथे बांगलादेशाने पाकिस्तानला नमवत किताब जिंकला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, श्रीलंकेच्या वेबसाइटवरील जयललिलतांचा फोटो