आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CBI वर सृजन घोटाळा दाबण्याचा दबाव, गिरीराज यांच्यावर गुन्हा का नाही; तेजस्वी यादवाचा सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लालू आणि तेजस्वी यादव. - Divya Marathi
लालू आणि तेजस्वी यादव.
भागलपूर- बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी सृजन घोटाळा हा 2 हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप केला आहे. नितीश कुमार, सुशील मोदी, गिरीराज सिंह आणि शाहनवाज हुसैन हे सगळे या घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप यादव यांनी केला. नितीशकुमारांना राजदपासून दुर जाण्याचा बहाणा हवा होता, असे ते म्हणाले. या प्रकरणात गिरीराज सिंह यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भागलपूर येथील एका रॅलीत तेजस्वी यादव बोलत होते. 
 
आणखी काय म्हणाले तेजस्वी यादव
CBI वर सृजन घोटाळा दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी लावला. नितीशकुमार, सुशील मोदी आणि गिरीराज सिंह यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येत नाही असा सवाल त्यांनी केला. 
- सृजन घोटाळा हा व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. यात अनेक लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे. हा कट आहे. नितीशकुमारांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना नेमले आहे. त्यांना पुरावे नष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. नितीशकुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...