आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Srinagar Jammu Highway Close For Continuous Snowfall

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीनगर-जम्मू महामार्ग ठप्प, रस्त्यावर पसरला पाच फूट उंचीचा बर्फ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिमवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू महामार्गावर पाच फूट उंचीचा बर्फाचा थर साचला आहे. परिणामी श्रीनगर-जम्मू महामार्ग बंद करण्‍यात आला आहे. हिमवृष्टी पुढील 24 तास कायम राहाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महामार्ग कधी सुरु होईल, याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दिल्ली-एनसीआरमध्ये रविवारी रात्री हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
जम्मूमधील बन्नीहाल आणि बतोतेदरम्यान महामार्गावर पाच फूट उंचीचा बर्फ साचला असल्याची माहिती श्रीनगरमधील एका वाहतूक अधिकार्‍यांने दिली. हिमवृष्टी थांबल्यानंतरच महामार्ग मोकळा करण्‍याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जम्मूसह परिसरात रविवारपासून सलग हिमवृष्टी होत असल्याने धुके पसरले आहे. त्याचा विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात झालेल्या हिमवृष्टीमुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, हिमवृष्टीचे छायाचित्रे...