आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K: पुन्‍हा दाखवले IS चे झेंडे, हाफिजचे पोस्टर, सुरक्षा पथकांवर केली दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू-काश्‍मिरमध्‍ये शुक्रवारी पुन्‍हा एकदा पाकिस्तान आणि आयएसआयएसचे झेंडे दाखवण्‍यात आले आहेत. श्रीनगरच्‍या जामिया मशिदमध्‍ये नमाजनंतर आंदोलकांनी मुंबई हल्‍ल्याचा मास्‍टरमाइंड हाफिज सईद याचे पोस्‍टर दाखवले. यावेळी सुरक्षा रक्षकांवर दगडफेकही करण्‍यात आली. या परिसरात यापूर्वीही कित्‍येकदा पाकचे झेंडे दाखवण्‍यात आले आहेत.
आंदोलकांनी आखली दगडफेकीची योजना..
- मिळालेल्‍या माहितीनुसार, आंदोलकांनी लहान मुलांना समोर करून सुरक्षा पथकांवर दगडफेक केली.
- सुरक्षा पथकांना कोणतीही कारवाई करता येऊ नये यासाठी महिला आणि लहान मुलांना आंदोलकांनी समोर केले.
- आंदोलकांनी नकाब परिधान करून दगडफेक केली.
घटनेमागे 12 युवकांचा गट
- पोलिस अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आयएसआयएस आणि पाकिस्‍तानचे झेंडे फडकावण्‍यामागे 12 युवकांचा एक ग्रुप आहे.
- सीसीटीव्‍ही फुटेज आणि फोटोंमधून या ग्रुपशी संबंधित युवकांचा तपास घेतला जात आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.
- या घटनांचा सुत्रधार कोण आहे, याचाही पोलिस तपास घेत आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा फोटो...