आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची मजूराला धडक, मृतदेह उडून गाडीच्या छतावर; त्याच स्थितीत 3 KM पळवली कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महबूबनगर (तेलंगणा) - हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कारने एका मजूराला जोरदार धडक दिली. मजूर हवेत उडून कारच्या छतावर जाऊन आदळला. मात्र बेदरकार कार ड्रायव्हर थांबला नाही, त्याने त्याच स्थितीत जवळपास 3 किलोमीटर पर्यंत कार पळवली. स्थानिक आणि हायवे पोलिसांनी पाठलाग करुन कार पकडली. मात्र तरीही ड्रायव्हर फरार होण्यात यशस्वी झाला.
केव्हा आणि कुठे झाला अपघात
- ही दुर्घटना हैदराबाद - बंगळुरु महामार्गावर सोमवारी रात्री 10 वाजता घडली.
- निम्मागाड्डाबावी गावातील 35 वर्षांचा श्रीनिवासुलु बसस्टॉकडे जाण्यासाठी रोड क्रॉस करत होता.
- पोलिसांनी सांगितले, की कुर्नूल येथून येत असलेल्या (AP-28CK-8477) कारने मजूराला जोरदार धडक दिली. कार अतिशय वेगात होती.
- श्रीनिवासुलु हवेत उडाला आणि कारच्या छतावर जाऊन पडला. ड्रायव्हरने कार थांबवण्याऐवजी आणखी वेग वाढविला.
- त्याने याचाही विचार केला नाही की दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह कारवर पडला आहे.
बातम्या आणखी आहेत...