आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेडी कॉन्स्टेबलला हॉटेलमध्ये भेटायला बोलवायचा ASP, नाइट ड्यूटीमध्ये करायचा असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - इंदूर सीआयडीमधील डीएसपी पवन मिश्रा आणि त्यांचे नातेवाईक अनुज पांचे यांच्या विरोधात गुरूवारी सायंकाळी शहापूरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डीएसपीने महिलेला पति असल्याचे भासवले आणि तिच्यासोबत शारिरीक संबंध बनवले. महिलेने पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा त्याने तिला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन मारहण केली असल्याचे तपासतून पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. पोलिसांनी आद्याप दोन्ही अटक करण्यात आलेली नाही.


एसपी राहूल लोधा यांनी सांगितले की, महिलेच्या निवदेनाची चौकशी एसएसपी हितेश चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. गुरूवारी चौधरी यांनी तपास अहवाल सादर केला, त्याच्या आधारावार ही कार्यवाही करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. 


निवृत्तीनंतर तुझ्याशी लग्न करेल....
पीडित महिलेने सांगितले की, वर्ष 2005 मध्ये तत्कालीन हबीबगंज ठाण्याचे प्रभारी पवन मिश्रा यांच्यी ओळख झाली होती. तेव्हापासून आम्ही एकमेकांना भेटू लागलो. देवाला साक्षी माणून त्यांनी मला पत्नीच्या स्वरूपात स्विकारले होते. काही दिवसांनंतर त्याचे इंदूरला बदली झाली, तेव्हा ते मला तिथे भेटालया बोलवू लागले. त्यांची नाईट ड्यूटी असली, की ते मला हॉटले कांचनमध्ये भेटत होते. मी त्यांच्याकडे लग्नासाठी नेहमी अग्रह करत होते, परंतु  निवृत्तीनंतर मी तुझ्याशी लग्न करेल असे सांगून ते नेहमी टाळत होते.  मार्च 2016 मध्ये त्यांच्या पत्नीला आमच्याविषयी कळाले. आता मला आणि माझ्या मुलाला जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. डिसेंबर 2016 मध्ये सीएसपी हे अनुज पांडेसोबत भोपाळमधील माझ्या घरी आले आणि शेजारच्यांना एकत्र करून माझ्यासोबत मारहाण केली. तसेच मी केस परत नाही घेतली तर मला खोट्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिली.  


होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा...
पति असल्याचे भासवून शारीरिक संबंध बनवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, त्याल दहा वर्षाची शिक्षा आणि दंड होण्याची शक्यत आहे. पोलिसांनी केस दाखल केल्याची माहिती पोलिस मुख्यालयाला दिली आहे. 


पुढील स्लाइडवर पाहा लेडी कॉन्स्टेबल आणि एसएसपीचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...