आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stamped In Godavari River Pushkaralu 27 Pilgrims Dies In Andhra Pradesh

आंध्र प्रदेश: 144 वर्षांत एकदा येणाऱ्या महापुष्कर मेळ्यात चेंगराचेंगरी, 27 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजमुंद्री - आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीमध्ये सुरू असलेल्या पुष्कर मेळ्यात मंगळवारी चेंगराचेंगरी होऊन २७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे. अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना गोदावरी नदीच्या किनारी सकाळी ७.३० ते आठ वाजेच्या दरम्यान घडली. दर १२ वर्षांनी भरणारा हा मेळा १२ दिवस चालणार आहे.

राजमुंद्रीचे उपजिल्हाधिकारी विजया रामाराजू यांनी सांगितले की, जखमींना सरकारी आणि स्थानिक रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. त्यांनी सांगितले की, काही लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला असावा, अशी शक्यता आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हेही गोदास्नानासाठी आले होते. त्यांनी सांगितले की, भाविकांसाठी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मी अनेकदा येथे आलो होतो. बनवलेल्या व्यवस्थेचे योग्य पद्धतीने पालन न केल्याने ही दुर्घटना घडली.

१४४ वर्षांनी पुष्कर याेग
मंगळवारी महापुष्कर स्नानाचा योग १४४ वर्षांनंतर आला होता. या वेळी गुरू सिंह राशीत प्रवेश करतो. १४४ वर्षांपूर्वी असाच मुहूर्त होता. म्हणून त्याला महापुष्करालु म्हणतात.असा पुढचा योग आणि महापुष्करालु २१५९ मध्ये येईल.