आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पौर्णिमा स्नानादरम्यान गर्दीत 3 महिलांचा मृत्यू; बेगुसरायची घटना, नंतर चेंगराचेंगरीत 10 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेगुसराय- बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात कार्तिक पौर्णिमा स्नानासाठी गंगेच्या किनाऱ्यावर झालेल्या गर्दीत जीव गुदरमरून तीन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे.  

यानंतर सिमरिया घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत तीन पोलिस शिपायांसह १० जण जखमी झाले. पोलिसांनी आधी चेंगराचेंगरी झाल्याचे सांगितले होते. नंतर एसपी आदित्यकुमार यांनी गर्दीत श्वास काेंडूनच तीन महिलांचा मृत्यू झाल्याचा दावा केला. 

विशेष म्हणजे, कार्तिक पौर्णिमा आणि अर्ध कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने येथे भाविक जमले होते. सकाळी सुमारे ६.१५ वाजता प्रवासी रेल्वेतून उतरून गंगेच्या किनाऱ्याकडे जात होते. 
अत्यंत अरुंद रस्त्याने प्रचंड गर्दी जात होती. त्यातच तीन वृद्ध महिलांचा जीव गुदमरून मृत्यू झाला. त्याची माहिती कळताच चेंगराचेंगरी सुरू झाली. गर्दीतील एक जमाव घाट नंबर १ कडे वळला. यामुळे गंगेकिनारी अचानक मोठा लोंढा उसळला. त्यात घाटावर तैनात शिपाई जखमी झाले. एडीजी (मुख्यालय) सुनीलकुमार सिंघल यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांचा निष्काळजीपणा असल्याचे समोर आल्यास कारवाई केली जाईल.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, गंगेच्या घाटावरील सकाळचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...