आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stampede At \'Godavari Pushkaralu\' Kills 12 In Andhra Pradesh

पुष्करालु मेळ्यात चेंगराचेंगरी, 25 ठार, मृतांच्या वारसाला 10 लाखांची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गर्दीमुळे अडकलेले एक कुटुंब. - Divya Marathi
गर्दीमुळे अडकलेले एक कुटुंब.
हैदराबाद - राजामुंद्री येथील पुष्करालु घाटावर झालेल्या चेंगराचेंगरीत चार महिलांसह २५ जण ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची संख्याही अधिक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आंध्रप्रदेश सरकारने मृतांच्या वारसासाठी 10 लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे.
स्नान करण्यासाठी जमले हजारो भावीक
मंगळवारी सकाळी हजारोंच्या संख्येने भावीक याठिकाणी स्नान करण्यासाठी जमले होते. मात्र, अद्याप दुर्घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या भावीकांबाबत दुःख व्यक्त केले आहे.
कुंभमेळ्याप्रमाणेच आंध्रप्रदेशामध्ये दर 12 वर्षांनी गोदावरी नदीच्या काठी पुष्करम या उत्सवाचे आयोजन केले जाते. पवित्र गोदावरी नदीमध्ये स्नान करणे हे या उत्सवातील मुख्य वैशिष्ट्य असते. यंदाचा उत्सव हा 144 वर्षांतून एकदा येणारा असल्याने त्याला महापुष्करम असे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदा येणाऱ्या भाविकांची संख्याही जास्त असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

12 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कोट्यवधी भावीक याठिकाणी भेट देणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी आंघोळीसाठी जवळपास 263 घाट आहेत. तर तेलंगणामध्ये अशा प्रकारचे 106 घाट आहेत. या घाटांवर पवित्र स्नान करण्यासाठी भावीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे. आंध्रप्रदेश आणि तेलंगणा दोन्ही राज्यांतील प्रशासनाने हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव करीमनगर जिल्ह्यामध्ये धर्मपुरी याठिकाणी पवित्र स्नान करणार आहेत.