आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

88 फूट उंच दुर्गा पाहाण्यासाठी लाखोंची गर्दी, उडाला गोंधळ, पोलिसांनी बंद केले दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - दुर्गा पुजे दरम्यान कोलकत्यातील 88 फूट देवीची मूर्ती पाहाण्यासाठी रविवारी गर्दी उसळली आणि गोंधळ उडाला चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे सोमवारी पोलिस प्रशासनाने दर्शन बंद केले आहे. चेंगराचेंगरीत 11 लोक जखमी झाले. देशोप्रियो पार्कमध्ये पंचमीच्या दिवशी ही घटना घडली. दोन दिवसांमध्ये मूर्ती पाहाण्यासाठी 21 लाख लोक आल्याचा दावा करण्यात आला होता. रविवारी 10 लाखांहून जास्त लोक आल्याचा आयोजकांनी दावा केला आहे. बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही या दुर्गा मूर्तीचा फोटो ट्विट केला आहे.

काय आहे बिग बींचे ट्विट
मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी पश्चिम बंगालमधील उत्सव आणि संस्कृतीबद्दलच्या आपल्या प्रेमाला ट्विटरवरून पुन्हा वाट मोकळी करून दिली. कोलकात्यात सर्वात उंच दुर्गादेवीची माहिती बिग बींना आहे.

कोलकात्यातील देशप्रिया पार्क येथील दुर्गा प्रतिमेचे भाविकांना यंदा अधिक आकर्षण आहे. येथील मूर्ती सुमारे 88 फूट उंच आहे. कोलकात्यात यापेक्षा उंची मूर्ती दुसरी नाही. सिमेंटपासून तिची निर्मिती करण्यात आली आहे. जगातील ही सर्वात मोठी मूर्ती आहे. मूर्तिकार मिंटू पाल यांनी आपल्या 40 सहकाऱ्यांच्या मदतीने ही मूर्ती प्रत्यक्षात उतरवली आहे, अशी माहिती अमिताभ यांनी ट्विट करून सांगितली. ही मूर्ती आठ मजली इमारतीएवढी आहे, असे आयोजकांनी सांगितले.
एवढी गर्दा का
>> कोलकत्यातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी दुर्गा मूर्ती असा प्रचार करण्यात आला. यामुळे देवीची विशालकाय मूर्ती पाहाण्यासाठी भावीकांनी गर्दी केली.
>> मूर्ती पाहाण्यासाठी आणि दर्शनासाठी रविवारी सुटीच्या दिवसानिमत्त लाखो भाविक आले. वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोलकत्याचे पालिस आयुक्त सुरजीत पुरकायस्थ आणि अधिकारी मंडपाच्या दिशेने निघाले मात्र गर्दीमुळे त्यांना तिथे पोहोचता आले नाही. अखेर पोलिसांना मेट्रो पकडून मंडपापर्यंत जावे लागले.
>> रविवारी झालेल्या गोंधळानंतर दर्शन बंद करण्यात आले.
>> पोलिस आयुक्त म्हणाले, आयोजकांनी गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही उपयायोजना केली नव्हती. त्यामुळे रविवारची घटना घडली.
>> देवीच्या मूर्तीच्या दर्शनासाठी एवढी गर्दी उसळली की रस्ते देखील जाम झाले. कालीघाटी स्टेशनपासून मेट्रो सेवाही विस्कळित झाली होती. त्यामुळे 10 मिनिट मेट्रो बंद ठेवण्यात आली.
पुढील स्लाइडमध्ये संबंधित फोटो
बातम्या आणखी आहेत...