आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : झारखंडमधील वैजनाथ धाममध्‍ये चेंगराचेंगरी; 11 भाविक ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा

रांची - झारखंडमधील देवघर येथील प्रसिद्ध शिवमंदिरात आज (सोमवार) सकाळी 4.45 वाजता चेंगराचेंगरी झाली. यात 11 कावडयात्रेकरूंचा मृत्‍यू झाला तर 50 पेक्षा अधिक जखमी झालेत.
उत्‍तर भारतात श्रावण महिना सुरू झाला आहे. त्‍या अनुषंगाने आज दुसरा श्रावण सोमवार असल्‍याने कावड यात्रेकरूंनी लाखोच्‍या संख्‍येने गर्दी केली होती.
देवघरचे उपायुक्‍त अमित कुमार यांनी सांगितले, जलाभिषेकासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. त्‍यासाठी तब्‍बल 10 किलोमीटर दूर रांग लागली होती. रांगेत पुढे जाण्‍यासाठी काही भाविकांनी हुज्‍जत घातली. यातून मंदिरापासून तीन किलोमीटर अंतरावर चेंगराचेंगरी झाली. यात 11 जणांचा मृत्‍यू झाला आहे.
वैजनाथ धामच्‍या नावा प्रसद्ध आहे मंदिर
देवघरमधील हे शिव मंदिर वैजनाथ धाम नावाने देशभर प्रसिद्ध आहे. बारा ज्‍योर्तिलिंगापैकी ते एक असल्‍याने या ठिकाणी रोजच भाविकांची प्रचंड गर्दी असते. श्रावणात त्‍यात कितीतरी पट वाढ होते.
अशी झाली चेंगराचेंगरी ?
1. श्रावण सोमवार
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्‍या देवघरच्‍या या मंदिराला बाबा वैद्यनाथ मंदिर म्‍हणून ओळखतात. आज श्रावण सोमवार असल्‍याने दर्शनासाठी 1 लाखांपेक्षा अधिक रांगेत होते. यात कावडधारी अधिक‍ होते.

2. दोरी उचलताच कावडीधारी पळाले
दर्शनासाठी रांगेत असलेले भाविक पुढे जाण्‍यासाठी घाई करत होते. त्‍यामुळे बंदोबस्‍तासाठी असलेल्‍या पोलिसांनी रांगेची दोरी थोडी वर उचचली. याच संधीचा फायदा घेत कावडधारी भाविक पळायाला लागले. त्‍यामुळे गर्दी अनियंत्रित झाली आणि ही दुर्घटना घडली.

3. श्रावणी यात्रेमुळे देशभरातून कावडधारी
गर्दी अनियंत्रित झाल्‍याचे आणखी एक कारण म्‍हणजे या ठिकाणी श्रावणी सोमवाराला देशभरातून अनेक कावडधारी जलाभिषेकासाठी येतात. त्‍या अनुषंगाने या ठिकाणी यात्रा लागते. यात्रेत कावडधा-यांच्‍या राहण्‍या आणि जेवण्‍याची व्‍यवस्‍था केली जाते. पण, यंदा भाविकांची संख्‍या वाढली. त्‍यामुळे नियोजन ढासाळून दुर्घटन घडली.
येथे करा संपर्क
दुर्घटनेची माहिती मिळवण्‍यासाठी भाविकांच्‍या नातेवाईकांनी या 06432- 232299/ 240577 हेल्‍पलाइनवर संपर्क करण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.
यापूर्वी झाला होता नऊ लोकांचा मृत्‍यू
या मंदिरामध्‍ये वर्ष 201 2मध्‍येही चेंगराचेंगरी झाली होती. यात 9 भाविक ठार तर 30 जखमी झाले होते. त्‍यावेळची घटनाही सकाळी 5.30 च्‍या सुमारास झाली होती. दरम्‍यान, याच याच वर्षी काही दिवसापूर्वीही अशीच चेंगरा चेंगरी झाली होती. त्‍यात 12 भाविक जखमी झाले होते. मात्र, तरीही मंदिर प्रशासनाने यावर उपाययोजना केली नाही.
एक मृतकाची ओळख पटली
या दुर्घटनेत ठार झालेल्‍यांपैकी एका भाविकाची ओळख पटली असून, प्रदुमन गुप्ता असे त्‍यांचे नाव आहे. गुप्‍ता हे बिहारमधील पामगुंज (जि.अररिया) येथील रहिवाशरी आहेत.
जखमी असलेल्‍या काहींची नावे
उमाशंकर राजभर – गाजीपूर, उत्तर प्रदेश
परमेश्वरी देवी – गाजीपूर
बबलू रॉय – बहराइच, उत्तर प्रदेश
सुशीला देवी – नेपाळ
राजकिशोर मंडल – नेपाळ
द्रोपदी देवी – मधेपुरा
सुदर्शन बिंद – गया
मुकुल शर्मा – गुआलपड़ा, मधेपुरा
प्रशांत सोनी – बलिया, उत्तर प्रदेश
गुरिया देवी – सिकंदरपूर, बलिया, उत्तर प्रदेश
वसुमती देवी – बलिया, उत्तर प्रदेश
सरस्वती देवी – बलिया, उत्तर प्रदेश
ललित पंडित – दरभंगा, बिहार
बुंदेला यादव – बलिया, उत्तर प्रदेश
पुढील स्‍लाइड्वर पाहा संबंधित फोटोज...