आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श वडील: मुलीच्या शिक्षणासाठी वडील बनले विद्यार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर- ‘शालेय शिक्षणानंतर मुलीने महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परिचितांनी त्याला विरोध केला होता; परंतु मी मुलीला साथ दिली. मुलीसोबत मीही शिकेन, असे उत्तर विरोधकांना दिले. मुलीसोबत महाविद्यालयात जाईन. तिला सोबत घरी आणणे ही सर्व कामे करेल. देशाला मेरी कोम, सायनासारख्या मुलींचा गर्व वाटतो. मला माझ्या मुलीवरही गर्व आहे. मी तिच्या इच्छा मारण्याचे पातक करायचे नाही,’ असे जैसलमेरच्या पारावेर गावातील चंदनसिंह भाटी सांगतात.

मुलगी पुष्पा कंवरसाठी ते गाव सोडून उदयपूरला आले. मुलीसोबत स्वत:च्या पदवी शिक्षणाला सुरुवात केली. पहिले आणि दुसरे वर्ष यशस्वी पूर्ण केले. आता हे वडील-मुलगी दोघेही पदवीच्या तिसऱ्या वर्षात सोबत शिक्षण घेत आहेत. १२ वी झाल्यानंतर पुष्पाच्या महाविद्यालयीन शिक्षणाचा विषय पुढे आला. त्या वेळी परिचितांनी त्याला विरोध केला. त्या वेळी १२ वी उत्तीर्ण चंदन यांनी पुष्पाची साथ दिली. स्वत:चे शिक्षणही नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुष्पा सनदी परीक्षेची तयारी करत आहे. वडील तिला पदोपदी सहकार्य देत आहेत.

पुष्पा म्हणाली, गावातच राहिले असते तर मला कॉलेज पाहताही आले नसते. कदाचित एवढ्यात माझा विवाहदेखील झाला असता. परंतु वडिलांनी माझ्या मनातील गोष्ट ऐकली. त्यांनी माझ्यासाठी गाव सोडले. आम्ही उदयपूरला आलो. ग्रामीण भागात मुलींना घरातील कामे करण्याचा सल्ला दिला जातो. मुलींना मनरेगाच्या कामावर पाठवले जाते. परंतु शाळेत पाठवले जात नाही.

माझ्या वडिलांनी मात्र मला कधी घरातील कामही करू दिले नाही. संपूर्ण काम आईच सांभाळते. बीए केल्यानंतर मी आयएएसची तयारी करणार आहे. बीएला माझे आणि पापांचे विषयदेखील सारखेच आहेत. आम्ही सोबतच अभ्यास करतो. परस्परांना मदत करतो. वडिलांसोबतच मला गुरू, सहाध्यायी मिळाले आहेत. वडिलांनी खूप त्याग केला. आता माझी वेळ आहे. मला यशस्वी
होऊन दाखवायचे आहे.

दुजाभाव कशामुळे ?
तीन मुलांच्या शिक्षणासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. मग मुलीच्या शिक्षणासाठी दुजाभाव कसा ठेवू शकेल ? म्हणूनच बहिस्थ विद्यार्थी म्हणून तिच्यासोबत अध्ययनाला सुरुवात केली. दरम्यान, पुष्पाला स्थळ आले. परंतु वरपक्षाने हुंड्याची मागणी केल्याने आम्ही नकार दिला. मुलीचा वडील असल्याचा मला गर्व आहे. तिच्या आनंदासाठी काहीही करू शकतो. मग तिच्यासाठी समाजाशी लढणे मोठी गोष्ट कशी असेल?