आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप्ससाठी कंपनी झटपट बंद करणे शक्य, छोट्या कंपन्या, एलएलपीच्या नियमांत बदल होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्टार्टअप्स व छोट्या कंपन्यांसाठी आता व्यवसाय बंद करणे अधिक सोपे होणार आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी (आयबीबीई) नियमांत बदल केले जाणार आहेत. त्यानुसार आयबीबीईच्या नव्या नियमांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.   
स्टार्टअप्स व छोट्या कंपन्यांसाठी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) फर्मलादेखील त्यात सामील करून घेतले जाणार आहे. नव्या मसुद्यासाठी ८ मेपर्यंत सर्व पक्षांना आपला सल्ला देता येऊ शकेल. आयबीबीई कंपन्यांसंबंधीच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते. मसुदा तयार करण्यासाठी मंत्रालयाने एक कार्यकारी गट तयार केला होता. कंपनी कायदा-२०१३ मधील परिभाषा स्टार्टअपसाठी लागू करण्यात येईल.   
 
२ काेटी रुपयांहून कमी कर्जाचा निकष  : एखादी कंपनी किंवा एलएलपीने दोन कोटींहून अधिक कर्ज घेतलेले नसल्यास त्यांना व्यवसाय झटपट बंद करण्याची सुविधा उपलब्ध होईल. मसुद्यानुसार व्यवसाय बंद करण्याची प्रक्रिया केवळ १८० दिवसांत पूर्ण करावी लागेल. 
 
स्टार्टअप्सचे यश चांगले : बालाकृष्णन  
 हैदराबाद - भारतात स्टार्टअप्सची यशस्वी वाटचाल सुरू आहे. देशात दहापैकी तीन-चार कंपन्या यशस्वी होत आहेत, असे मत इन्फाेसिसचे माजी सीएफआे व्ही. बालाकृष्णन यांनी व्यक्त केले.   
विशेष मुलाखतीत ते म्हणाले, येथे दहापैकी तीन-चार कंपन्यांची वाटचाल यशस्वीरीत्या सुरू होत असल्याचे दिसून आले आहे. किरकोळ ग्राहकांसाठी उत्पादन निर्माण करणाऱ्या कंपन्यांसाठी हे आव्हान ठरू शकते. परंतु अशाही परिस्थितीत स्टार्टअप्ससमोर काही आव्हानेदेखील आहेत, असे त्यांनी सांगितले. अलीकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या मूल्यात घसरण होत चालली आहे. त्यावर बालाकृष्णन म्हणाले, या गोष्टीला अनेक पदर आहेत. परंतु आज केवळ आयटी उद्योग भरभराटीला लागला आहे हे वास्तव आहे. त्यात कॅश फ्लो व इक्विटीवर चांगला परतावा मिळतो.
 
बातम्या आणखी आहेत...