आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • State Government Failed To Deal With Kashmir Situation Says All Party Delegation

काश्मीरप्रश्नी सर्वांशी चर्चा, पण सार्वभौमत्वाशी तडजोड नाहीच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करावी, पण देशाच्या सार्वभौमत्वाबाबत कुठलीही तडजोड करू नये, अशी सूचना राज्याला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने बुधवारी केंद्र सरकारला केली. सरकारनेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना आपण चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले, सरकारने हुरियत कॉन्फरन्स या फुटीरवादी संघटनेचा मात्र कुठलाही उल्लेख केला नाही.

सर्वपक्षीय शिष्टमंडळ आणि सप्टेंबरला काश्मीरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील बुधवारी ही बैठक झाली. ती सुमारे तीन तास चालली. या बैठकीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा चर्चा सुरू करावी, काश्मीर खोऱ्यात विश्वास निर्माण होण्यासाठी नागरी भागातून अफस्पा मागे घेण्यासह इतर उपाययोजना कराव्यात आणि शांततेसाठी पडद्याआड चर्चा प्रक्रिया सुरू करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. राज्यातील नागरिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून चर्चेद्वारे सर्व प्रश्न सोडवावेत, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीनंतर हा ठराव पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी वाचून दाखवला. सरकार सर्वांशी चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोळीबार हे उत्तर नाही : शरीफ : इस्लामाबाद: काश्मीर खोऱ्यातील नागरिकांवर गोळीाबर करणे हे या समस्येवरील उत्तर नाही, त्याऐवजी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि त्यांच्या इच्छेला मान द्यावा, असे वक्तव्य करून पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी करून पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू केले आहे. रावळपिंडी येथे संरक्षण दिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते.
माकपचे सीताराम येचुरी बैठकीत म्हणाले की, बैठकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कामगिरीवर कुठलीही चर्चा झाली नाही. पण सध्या कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. सध्या काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची ही वेळ आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यासंदर्भात ठोस पावले उचलली होती. त्यांनी भारत स्वत:हून गोळीबार करणार नाही असे स्पष्ट केले होते तसेच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी चर्चा सुरू केली होती. अशीच पावले आता उचलणे गरजेचे आहे. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र येचुरी यांच्याशी असहमती दर्शवली. ते म्हणाले की, सध्याची स्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते.
नवी दिल्ली काश्मीरप्रश्नी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला जाताना गृहमंत्री राजनाथसिंह. यावेळी राज्याच्या दाैऱ्यावर गेलेले खासदार उपस्थित हाेते.
बातम्या आणखी आहेत...