आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Politics : Soren Father Sun First Chief Minister To In Jharkhand

'राज्य' कारण: मुख्यमंत्रीपद भूषवणारे सोरेन झारखंडमध्ये पहिले पितापुत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी शनिवारी राज्यपाल सईद अहमद यांच्याकडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात पिता-पुत्राने मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा पहिला मान सोरेन पिता-पुत्रांना मिळाला आहे.


शिबू सोरेन यांनी 2005 ते 2010 दरम्यान तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. त्याआधी उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंह व अखिलेश यादव तसेच जम्मू-काश्मीरमध्ये फारूक व ओमर अब्दुल्ला या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्रिपद भूषवले आहे. याव्यतिरिक्त ओडिशामध्ये बिजू व नवीन पटनायक, हरियाणामध्ये देवीलाल व ओमप्रकाश चौटाला तसेच महाराष्‍ट्रामध्ये शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण या पिता-पुत्र मुख्यमंत्रिपद विराजमान होते.शुक्रवारी रात्री राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्‍ट्रपती राजवट मागे घेतल्याचा आदेश बजावल्यानंतर राज्यपालांनी सोरेन यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. जेएमए-काँग्रेस-राजद आघाडीने 9 रोजी सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यांना काही छोट्या पक्षांनी व अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. जेएमएमने अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर 18 जानेवारी रोजी राष्‍ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


कॉँग्रेस-राजदच्या मंत्र्यांना शपथ
मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त काँग्रेस आमदार राजेंद्रप्रसादसिंग, राजद आमदार अन्नपूर्णादेवी यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 82 सदस्यांच्या विधानसभेत सोरेन यांनी 43 आमदारांच्या पाठिंब्याची यादी राज्यपालांना सादर केली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मानले जाते.राज्य स्थापनेच्या 13 वर्षांच्या कार्यकाळात झारखंडमध्ये आतापर्यंत नऊ मुख्यमंत्री झाले आहेत. बाबूलाल मरांडी, अर्जुन मुंडा, शिबू सोरेन व मधू कोडांनंतर ते पाचवे आदिवासी मुख्यमंत्री झाले आहेत.