आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Statement By Amitabh Bachchhan About Panama Papers

पनामा पेपर्स लीक : IT ची चौकशी सुरू असल्याचे अमिताभने केले मान्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पनामा पेपर्स प्रकरणी अमिताभ बच्चनने पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या 6-7 वर्षांपासून इनकम टॅक्स डिपार्टमेंट आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट (ईडी) काही प्रकरणांची चौकशी करत असल्याचेही त्याने मान्य केले. अमिताभ म्हणाला, मी सर्व प्रश्नांची उत्तरे आणि नोटीस उत्तरही देत आहे. मी कायदा पाळणारा नागरिक आहे. नुकतेच पनामा पेपर्स लीकमध्ये अमिताभ आणि ऐश्वर्या यांची नावे असल्याचे समोर आले होते.

अमिताभचे स्पष्टीकरण..
- अमिताभ म्हणाला, मी पनामा पेपरच्या वृत्ताबाबत पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, इंडियन एक्सप्रेमधील माहिती खरी नसून, मी त्या चार कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डारेक्टरर्समध्ये कधीही नव्हतो.
- गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या मुद्द्यावर चौकशी सुरू केली असून मी त्याबाबत आनंदी आहे. त्या चार कंपन्यांमध्ये माझे नाव कसे आले हे मलाच माहिती नसल्याचेही ते म्हणाले.
- यापूर्वीही अमिताभने आपला या कंपन्यांशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते.
ब्रँड अॅम्बेसेडर..
- अमिताभ म्हणाला, मला महाराष्ट्र टाइगर प्रिझर्व्हेशन कॅम्पेनमधू हटवण्याबाबतच्या कमेंट मी वाचल्या आहेत.
- हा महाराष्ट्र सरकारचा विशेषाधिकार असून मी त्याचा आदर करतो.
- काहीही निर्णय झाला तरी, सोशल इश्यूजवर काम करणे सुरू ठेवेल, असे ते म्हणाले.
- मी टायगर प्रिझर्व्हेशन, पोलियो, टीबी, हेपॅटायटिस बी, डायबिटीज, फॅमिली प्लॅनिंग अशा मुद्यांवर वैयक्तिकरित्या जोडलेला राहिल, असेही त्याने सांगितले.