आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावत्र आई 5 वर्षांच्या मुलीला पोत्यात बंद करून करत होती असे, Video आला समोर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सावत्र आई 5 वर्षीय मुलीला पोत्यात बंद करून टॉर्चर करते. - Divya Marathi
सावत्र आई 5 वर्षीय मुलीला पोत्यात बंद करून टॉर्चर करते.

चंदिगड - शहराच्या सेक्टर 29 मध्ये एका महिलेद्वारे 5 वर्षीय सावत्र मुलीला मारहाणीची घटना समोर आली आहे. महिलेच्या पतीने पोलिसांत याबाबत तक्रारही दाखल केली आहे. तक्रारीत म्हटल्यानुसार, त्याची दुसरी बायको मुलीला बेदम मारहाण करते आणि पोत्यात बंद करून आदळते. पतीने मुलीला टॉर्चर होतानाचा व्हिडिओही पोलिसांना सोपवला आहे, व्हिडिओ त्याच्या मोठ्या मुलाने बनवला आहे.

(व्हिडिओ पाहा पुढच्या स्लाइडवर )

 

असे आहे प्रकरण...
- तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, माझ्या मोठ्या मुलाने सांगितले की, सावत्र आई माझ्या 5 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण करते, तिला पोत्यात बंद करून टॉर्चर करते, तेव्हा माझा विश्वास बसला नव्हता. पण जेव्हा माझ्या मुलाने टॉर्चर करतानाचा व्हिडिओ दाखवला तेव्हा मला धक्काच बसला. यानंतर पतीने चाइल्ड वेल्फेअर कमिटीत तक्रार दिली की, त्याची पत्नी त्याच्या मुलीला जिवे मारून टाकीन.

 

दोन दिवसांपूर्वी पोलिस घरी आले होते, जबाब नोंदवून गेले...
- तक्रारकर्ता म्हणाला की, पोलिसांत तक्रार केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पोलिस घरी आले होते, जबाब नोंदवून ते गेले होते, परंतु आतापर्यंत याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. तथापि, पोलिस अधिकारी देवेंद्र कुमार म्हणाले की, त्यांनी याप्रकरणी रिपोर्ट तयार करून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवली आहे. त्यांच्या निर्देशावरून आरोपी महिलेविरुद्ध कारवाई केली जाईल.
- तक्रारकर्ता म्हणाला की, त्याच्या पहिल्या पत्नीचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू झाला. यानंतर त्याने 2016 मध्ये आरोपी महिलेशी लग्न केले. तक्रारकर्ता असेही म्हणाला की, त्याच्या दुसऱ्या पत्नीला मानसिक आजार आहे. तिच्यावर सेक्टर 32 हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, फोटोज आणि शेवटच्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...