आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्टॉकब्रोकरने केली पत्नीची हत्या, अनेक तुकडे करून मुलीसमोरच जाळला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- आंध्र प्रदेशात एका स्टॉकब्रोकरने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुपेश कुमार मोहमानी असे अारोपीचे नाव आहे. रुपेश याने पत्नीच्या हत्याकरुन तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. इतकेच, नव्हे तर त्याच्या पाच वर्षीय मुलीसमोर मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेली माहिती अशी की, रुपेश कुमार मोहनानी याचा स्टॉक ब्रोकरिंगचा बिझनेस आहे. त्याने पत्नी सिंथियाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे अ‍नेक तुकडे करून ते एका सुटकेसमध्ये भरले व ते मदनपल्लीच्या जंगलात नेले. तिथे त्याने पत्नीचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. कारमध्ये बसून त्याची पाच वर्षीय मुलगी हा सगळा प्रकार पाहात होती. धूर व दुर्गंधी पसरल्याने जवळच्या गावातील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केले.

पत्नीला हवा होता घटस्फोट
- पोलिसांनी सांगितले की, रूपेश व सिंथियाने 2008 मध्ये विवाह करून हैदराबादेत स्थायिक झाले होते. दोघे कान्गोमध्ये भेटले होते.
- मीडिया रिपोर्टनुसार, सिंथियाचे एका फ्रेंच फेसबुक फ्रेंडसोबत अफेयर सुरु होते.
- रूपेशशी काडीमोड घेऊन ‍तिला बॉयफ्रेंडसोबत संसार थाटण्याची तिची इच्छा होती. यावरून रुपेशसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले होते.

आरोपीची कार अंकुर अश्विनी नावाने रजिस्टर्ड...
- इन्स्पेक्टर एन. भास्कर यांनी सांगितले की, महिलेचा चेहरा जळल्यामुळे तिची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत आहे. ती कॉन्गोची राहाणारी होती.
- आरोपीची कार अंकुर अश्विनीच्या नावावर रजिस्टर्ड आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मुलीला कारमध्ये सोडून जंगलात पत्नीचा जाळत होता मृतदेह...
बातम्या आणखी आहेत...