आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stop Finding Faults, Find Rahul Gandhi First, Says Amit Shah At NE Meet In Bengaluru

आमच्या उणिवांचे सोडा, तुमचा नेता शोधा : शहा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला भूसंपादन विधेयकानेच प्रारंभ झाला. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी उद‌्घाटनाच्या भाषणातच हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांनी हेतुत: विधेयकाबाबत गैरसमज पसरवले.त्यात कोणत्याच उणिवा नाहीत. त्या शोधणे बंद करा. शोधायचेच तर तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) शोधा.
भूसंपादन विधेयक शेतकरी हिताचेच आहे. हा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे, असे शहा म्हणाले. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी आणि अर्थमंत्री अरुण जेटली मंचावर होते. शहा म्हणाले, पुढील १० ते २० वर्षे सत्तेत राहण्यासाठी मोदी सरकार आले आहे. ते भारताचा चेहरामोहरा बदलेल. आता घोटाळे होणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन राजकीय संस्कृती आणली आहे. ही बैठक शनिवारपर्यंत चालणार आहे.
घर सांभाळा : काँग्रेस

काँग्रेसचे मीडिया प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी शहा यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले की, किस्से व आरोपांच्या राजकारणाऐवजी आपले घर सांभाळा, असे शहा यांना आमचे सांगणे आहे. काळा पैसा कुठे गेला? अच्छे दिन कधी येणार? शेतकरी हैराण का आहेत? हे आम्ही त्यांना विचारू इच्छितो. आज ज्या पद्धतीने अडवाणी आणि जोशींचा सार्वजनिकरीत्या अपमान होत आहे, तो सर्वांसमोर आहे.